उत्तर प्रदेशच्या बुलंदशहरामध्ये सोमवारी रात्री उशिरा दोन साधूंची हत्या करण्यात आली आहे. बुलंदशहरातील एका मंदिरामध्ये धारधार शस्त्राने वार करुन या साधूंची हत्या करण्यात आली. त्यावेळी दोन्ही साधू झोपलेले होते. मंगळवारी सकाळी मंदिरामध्ये आलेल्या गावकऱ्यांनी साधूला रक्ताच्या थारोळ्यात पडलेले पाहिले. त्यांनी ताबडतोब पोलिसांना फोन करुन बोलावले. या घटनेमुळे बुंलदशहरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
मुंबईतील ५५ पेक्षा जास्त वयाचे पोलिस घरी थांबले तरी चालेल - आयुक्त
बुलंदशहरातील अनपशहरच्या पगोना गावात ही धक्कादायक घटना घडली आहे. गावातील शिव मंदिरामध्ये जगनदास (५५ वर्ष) आणि सेवादास (३५ वर्ष) हे दोन साधू गेल्या १० वर्षांपासून राहत होते. सोमवारी रात्री उशिरा या साधूंची हत्या करण्यात आली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. मंदिरापासून दोन किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावातून आरोपीला अटक करण्यात आली.
कोरोना रुग्णांची सर्वाधिक संख्या असलेले हे आहेत १० देश...
आरोपी नशेच्या आहारी गेला असून पोलिसांनी त्यांची कसून चौकशी केली. या दरम्यान त्याने हत्या करण्यामागचे कारण सांगितले. दोन दिवसांपूर्वी आरोपीने साधूंचा चिमटा उचलला होता. त्यामुळे नाराज होत साधूंनी त्याला ओरडा दिला होता. याचाच राग मनात ठेवत आरोपीने सोमवारी रात्री उशिरा झोपेत असलेल्या दोन्ही साधूंची धारधार शस्त्राने वार करत हत्या केली, असल्याची माहिती पोलिसांनी दिली.