पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शबरीमला प्रकरणी सुप्रीम कोर्टाने दिलेला निकाल म्हणजे अंतिम शब्द नाही - सरन्यायाधीश

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना सध्या प्रवेश नाही

शबरीमलातील अय्यप्पा मंदिरात सर्व वयोगटातील महिलांना प्रवेश देण्याचे आदेश देणारा सर्वोच्च न्यायालयाचा सप्टेंबर २०१८ मधील निकाल म्हणजे अंतिम शब्द नसल्याचे सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. या प्रकरणी आता सर्वोच्च न्यायालयाच्या आणखी मोठ्या खंडपीठापुढे पुन्हा सुनावणी होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर सरन्यायाधीशांनी हे मत मांडले आहे. शबरीमला मंदिरात प्रवेश करण्यासाठी आपल्याला संरक्षण देण्याचे आदेश दिले जावेत, यासाठी महिला कार्यकर्त्या बिंदू अमिनी यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. 

अर्थव्यवस्थेवर सरकारची भूमिका दिशाहीन: चिदंबरम

सप्टेंबर २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचा आदर करण्याचे आदेश केरळ सरकारला द्यावेत. या निकालाची अंमलबजावणी करून सर्व वयोगटातील महिलांना सुरक्षितपणे शबरीमला मंदिरात प्रवेश दिला जावा, अशी मागणी बिंदू अमिनी यांनी याचिकेच्या माध्यमातून केली आहे. ज्येष्ठ वकील इंदिरा जयसिंग यांनी बिंदू अमिनी यांच्या वतीने न्यायालयात बाजू मांडताना याचिकेवर लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी केली. 

शबरीमला मंदिर लवकरच भाविकांसाठी बंद होणार आहे. त्यामुळे आमच्या याचिकेवर लवकर सुनावणी घेतली जावी, अशी मागणी इंदिरा जयसिंग यांनी केली. त्याचवेळी त्यांनी याचिकाकर्त्या बिंदू अमिनी यांच्यावर केरळमध्ये हल्ला करण्यात आला होता. हल्ल्यात रासायनिक पदार्थ वापरले गेले होते, याकडेही न्यायालयाचे लक्ष वेधले.

'गब्बर'ला बीसीसीआयकडून 'जबराट' शुभेच्छा!

सप्टेंबर २०१८ मध्ये या प्रकरणी दिलेला निकाल म्हणजे अंतिम शब्द नाही, असे सरन्यायाधीशांनी स्पष्ट केले. या प्रकरणी आता आणखी मोठ्या खंडपीठापुढे सुनावणी होणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. त्याचवेळी बिंदू अमिनी यांच्या याचिकेवर पुढच्या आठवड्यात सुनावणी घेण्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.