भारत-चीन यांच्यातील मतभेदांचा दोन्ही राष्ट्रातील द्विपक्षीय संबंधावर परिणाम होऊ नये, असे मत भारतीय परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केले. सोमवारी त्यांनी चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी दोन्ही राष्ट्रातील संबंधावर भाष्य केले. केंद्र सरकारने जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा निर्णय घेतल्यानंतर चीनने आक्षेप नोंदवला होता. या पार्श्वभूमीवर जयशंकर यांनी मांडलेली भूमिका महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
दिल्ली ते लाहोर बससेवाही स्थगित
आयएएनएसशी बोलताना जयशंकर म्हणाले की, आंतरराष्ट्रीय राजकारणात भारत आणि चीन यांच्यातील संबंध उच्च पातळीवर आहेत. दोन्ही राष्ट्रातील संबंध हे जागतिक स्थिरतेमध्ये प्रभावित ठरणारे असायला हवेत. जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवण्याचा निर्णय हा भारताचा अंतर्गत मुद्दा असल्याचे दोन्ही नेत्यांच्या भेटीपूर्वीच भारताकडून स्पष्ट करण्यात आले होते.
लडाख सीमेवर पाकच्या हालचाली तीव्र, विमानं तैनात
यावेळी वांग म्हणाले की, भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावपूर्ण परिस्थितीवर आम्ही नजर ठेवून आहे. आम्ही भारत सरकारला आवाहन करतो की शांती आणि स्थिरता कायम राहिल, यादृष्टिने पावले उचलली जावीत. चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या भेटीनंतर जयशंकर यांनी चीनचे उप-राष्ट्रपती वांग किशान यांची बिजिंगमध्ये भेट घेतली.