पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

परराष्ट्र मंत्री जयशंकर गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी

एस जयशंकर यांनी सोमवारी औपचारिकरित्या भाजपत प्रवेश केला (PTI photo)

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे औपचारिकरित्या भाजपत सामील झाल्यानंतर काही वेळातच त्यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. जयशंकर यांनी सोमवारी भाजपचे कार्यकारी अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या उपस्थितीत पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्चर्यकारक पाऊल उचलत माजी परराष्ट्र सचिव जयशंकर यांना आपल्या सरकारमध्ये सहभागी करत त्यांना थेट परराष्ट्र मंत्री केले होते.

जयशंकर यांनी ३० मे रोजी सरकारच्या इतर सदस्यांबरोबर कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली होती. जी व्यक्ती संसदेत्या कोणत्याच सभागृहाची सदस्य नसते. तेव्हा त्या व्यक्तीला शपथ ग्रहण केल्यापासून सहा महिन्याच्या आत संसदेचे सदस्य झाले पाहिजे. जयशंकर हे संसदेच्या कोणत्याच सभागृहाचे सदस्य नाहीत. 

परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचा औपचारिकपणे भाजपमध्ये प्रवेश

भाजप अध्यक्ष अमित शहा आणि स्मृती इराणी हे लोकसभेत निवडून गेल्यामुळे गुजरातमधील २ जागांवर पोटनिवडणूक होणार आहे. भाजपने यातील एका जागेसाठी जयशंकर तर दुसऱ्या जागेसाठी जुगलजी माथुरजी ठाकरे यांना उमेदवारी दिली आहे. १९७७ च्या आयएफएस बॅचचे अधिकारी असलेल्या जयशंकर यांनी परराष्ट्र मंत्रालयात विविध पदांवर काम केलेले आहे.

जयशंकर हे अमेरिका आणि चीनसारख्या महत्वपूर्ण देशांमध्ये भारतीय राजदूत म्हणून उल्लेखनीय काम केले आहे. ते जानेवारी २०१५ ते जानेवारी २०१८ या कालावधीत परराष्ट्र सचिव होते. मोदींच्या पहिल्या कार्यकाळात विदेश नितीला आकार देण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती.