पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

धक्कादायक!, इन्स्टाग्रामवरील मॉडेलचा रशियात संशयास्पद मृत्यू

एकातेरिना काराग्लानोव्हा

इन्स्टाग्रामवर प्रसिद्ध असलेल्या रशियातील  मॉडेलचा मृतदेह एका सुटकेसमधून भरल्याचे तिच्या पालकांना आढळल्याने खळबळ उडाली. ती मॉस्कोमध्ये जिथे राहात होती. तिथेच एका सुटकेसमध्ये तिचा मृतदेह आढळला. एकातेरिना काराग्लानोव्हा असे या मॉडेलचे नाव आहे. तिचे इन्स्टाग्रामवर ८५ हजारांहून अधिक फॉलोअर्स आहेत. गळा कापून तिची हत्या करण्यात आली आहे.

'कॅफे कॉफी डे'चे संस्थापक सिद्धार्थ यांचा मृतदेह सापडला

रशियातील माध्यमांच्या वृत्तानुसार, हत्येपूर्वी एकातेरिना हिने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, याच्या कोणत्याही खुणा तिच्या शरीरावर आढळत नाहीत. त्याचबरोबर तिच्या घरामध्येही कोणतेही धारदार शस्त्र सापडलेले नाही. 

तिच्या घराबाहेरील सीसीटीव्ही दृश्यांमध्ये तिचा आधीचा प्रियकर काहीवेळा तिच्या घरामध्ये येत असल्याचे दिसते. पण त्याचा तिच्या मृत्यूशी काही संबंध आहे का, याची माहिती नाही. पोलिस या प्रकरणी तपास करीत आहेत. 

सरकार व बँका कोणालाही आयुष्यातून उठवू शकतात, विजय मल्ल्यांचे ट्विट

इन्स्टाग्रामप्रमाणेच एकातेरिना हिचे प्रवास वर्णनांचा ब्लॉगही प्रसिद्ध होता. अनेक जण तिच्या ब्लॉगला फॉलो करीत आहेत.