पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

इराण: मिथेनॉलने कोरोना बरा होतो, या अफवेने घेतला ३०० जणांचा बळी

इराणमध्ये मेथेनॉलने ३०० नागरिकांचा मृत्यू

कोरोना विषाणूबाबत सोशल मीडियावर अनेक अफवा पसरत आहेत. या अफवांवर विश्वास ठेवू नका असे सरकारकडून वारंवार सांगण्यात येत आहे. मात्र कोरोनाबाबतच्या या अफवेने इराणमध्ये ३०० नागरिकांचा बळी घेतला आहे. मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो अशी अफवा इराणच्या सोशल मीडियावर वेगाने पसरली. या अफवेला खरे मानून अनेकांनी मिथेनॉलचे सेवन केले. त्यामुळेच ३०० नागरिकांचा मृत्यू झाला तर १००० पेक्षा अधिक जण आजारी पडले. 

लॉकडाऊनमुळे गरीब लोक उद्ध्वस्त होतील, राहुल गांधींची टीका

न्यूज वेबसाइट डेली मेलने इराणच्या माध्यमांचा हवाला देत सांगितले की, इस्लामिक रिपब्लिकमध्ये मिथॅनॉलच्या सेवनाने ३०० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर आतापर्यंत १००० लोकं आजारी पडली आहेत. इराणमध्ये मद्यपानास बंदी आहे. मिथेनॉल आम्ली पदार्थ आहे. मिथेनॉल प्यायल्याने ३०० लोकांचा मृत्यू झाल्याची बातमी अशावेळी आली जेव्हा तेहरानमध्ये शुक्रवारी कोरोनामुळे आणखी १४४ लोकांच्या मृत्यू झाल्याचे जाहीर करण्यात आले. 

धक्कादायक! बारामतीत लॉकडाऊन दरम्यान १० पोलिसांना मारहाण

इराणच्या सोशल मीडियावर मिथेनॉल प्यायल्याने कोरोना बरा होतो ही अफवा वेगाने पसरली. लोकांनी यामागचे तथ्य जाणून न घेता ते प्यायले. मिथेनॉलचा वास येत नाही. तसंच त्याला कसलीच चव नसते. मिथेनॉलमुळे आपल्या शरीरातील अवयव आणि मेंदूला मोठा धोका असतो. ते प्यायल्याने लोकं कोमात जाण्याची शक्यता जास्त असते. 

COVID-19 अंतर ठेवायच म्हणजे त्यांना समाजातून आऊट करायचय नाही: सचिन

इराणमध्ये कोरोना विषाणूमुळे आतापर्यंत २ हजार ३७८ नागरिकांचा मृत्यू झाला तर ३२ हजार ३०० नागरिकांना कोरोनाची लागण झाली आहे. चीनच्या वुहान प्रांतातून वेगाने पसरलेल्या जीवघेण्या कोरोना विषाणूने जगभरातील २०० देशांमध्ये कहर केला आहे. या विषाणूने आतापर्यंत २० हजारांपेक्षा जास्त नागरिकांचा बळी घेतला आहे. 

रामायण, महाभारतनंतर शाहरूखच्या या मालिकेचे दूरदर्शनवर पुनर्प्रक्षेपण