पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे नवज्योतसिंग सिद्धूंकडे हे पद येण्याची शक्यता

नवज्योतसिंग सिद्धू

दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांच्या निधनानंतर आता दिल्ली प्रदेश काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण येणार, यावरील चर्चेला राजधानीच्या राजकीय वर्तुळात सुरुवात झाली आहे. पंजाबमधील आमदार आणि माजी मंत्री नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे ही जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अर्थात काँग्रेसच्या प्रदेश पदाधिकाऱ्यांनी याला कोणताही दुजोरा दिलेला नाही.

अलिबागच्या किनाऱ्यावरील बेकायदा बंगले आठवड्यात पाडा - हायकोर्ट

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली काँग्रेसच्या अध्यक्षपदाची जबाबदारी नवज्योतसिंग सिद्धू यांच्याकडे दिली जावी, अशी शिफारस करण्यात आली आहे. पण तूर्त यावर कोणताही निर्णय होण्याची शक्यता नाही. कारण राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिलेला असल्यामुळे काँग्रेसच्या अध्यक्षपदी कोण येणार हेच अजून निश्चित झालेले नाही. नवीन अध्यक्ष नियुक्त झाल्यावरच दिल्ली प्रदेश काँग्रेसचे प्रमुखपद कोणाकडे द्यायचे, यावर निर्णय घेतला जाईल.

दिल्ली काँग्रेसचे प्रभारी पी सी चाको म्हणाले, नवज्योतसिंग सिद्धू यांच्या संदर्भात कोणतीही चर्चा झाल्याचे माझ्या ऐकिवात नाही. दिल्ली काँग्रेसचा पुढील अध्यक्ष कोण असावा हे ठरविण्यासाठी प्रदेश काँग्रेस समितीची बैठकही झालेली नाही.

ओसामा बिन लादेनच्या मुलाचा मृत्यू; अमेरिकेची माहिती

नवज्योतसिंग सिद्धू हे अमृतसह पूर्व या मतदारसंघातून निवडून आले आहेत. ते पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या मंत्रिमंडळातही होते. मंत्रिमंडळाच्या फेररचनेमध्ये सिद्धू यांच्याकडे ऊर्जा, अपारंपरिक ऊर्जा ही खाती देण्यात आली. त्याबद्दल नाराजी व्यक्त करीत त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता. त्यांचा राजीनामाही स्वीकारण्यात आला आहे.