पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संघ स्वयंसेवकासह त्याची गरोदर पत्नी आणि लहान मुलाची निर्घृण हत्या

प्रकाश पाल आणि ब्युटी पाल

पश्चिम बंगालमधील मुर्शिदाबाद जिल्ह्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघातील एका स्वयंसेवकाची, त्याच्या गरोदर पत्नीची आणि लहान मुलाची निर्घृण हत्या करण्यात आली. प्रकाश पाल (३५), ब्युटी पाल (२८) आणि अंगन पाल (६) अशी या तिघांची नावे आहेत. मंगळवारी दुपारी या तिघांचे मृतदेह सापडले.

पवारांनी १५ वर्षांत महाराष्ट्रासाठी काय केलं, अमित शहांचा सवाल

ब्युटी पाल यांच्या पोटात आठ महिन्यांचे गर्भ होते. त्यांच्या आणि प्रकाश पाल यांच्या शरीरावर जखमा आढळून आल्या आहेत. तर त्यांचा मुलगा अंगन याची टॉवेलने गळा आवळून हत्या करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. 

स्थानिकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास प्रकाश पाल बाजारातून परत येताना त्यांना दिसले होते. पण त्यानंतर तासाभरातच या तिघांचे मृतदेहच आढळल्याने खळबळ उडाली. मुर्शिदाबादचे भाजपचे उपाध्यक्ष हुमायून कबीर यांनी सांगितले की प्रकाश पाल हे जरी संघ स्वयंसेवक असले तरी या हत्येचा त्याच्याशी काही संबंध नाही.

सरकारचा पीएमसी बँक घोटाळ्याशी काहीही संबंध नाही: निर्मला सीतारामन

प्रकाश पाल हे शिक्षक होते. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी नवे घर बांधले होते. याच घराच्या एका खोलीत वडील आणि मुलाचा मृतदेह आढळला. तर दुसऱ्या खोलीत रक्ताच्या थारोळ्यात त्यांच्या पत्नीचा मृतदेह पडलेला दिसून आला.