पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बजेटमध्ये ग्रामीण अर्थव्यवस्थेकडे लक्ष द्या, RSSचा केंद्राला सल्ला

महिला शेतकरी

राष्ट्रीय स्वंयसेवक संघ, थिंक टँकने सरकारला आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित करण्याचा आग्रह केला आहे. याप्रकरणाची माहिती असलेल्या तीन जाणकारांनी 'हिंदूस्थान टाइम्स'ला (एचटी) याबाबत सांगितले. ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रित केल्यास आर्थिक मंदी दूर करण्यास मदत मिळू शकते, असे मानले जाते. काहींनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मते, ही केवळ अर्थव्यवस्थेला उभारी देण्याची चांगली पद्धत नव्हे तर राजकीय दृष्ट्या त्याचा मोठा फायदाही होईल.

सरकारने अर्थसंकल्पावरुन आपल्या अंतर्गत आणि बाह्य हितधारकांशी संवाद साधण्यासही सुरुवात केली आहे. जूनमध्ये संपलेल्या तीन महिन्यात भारतीय अर्थव्यवस्था मागील २५ तिमाहीतील सर्वांत मंदगतीने वाढली आहे. जी केवळ ५ टक्के होती. एसबीआयने २०१९-२० मध्ये अंदाजित विकास दर ६.१ टक्क्यांनी घटून ५ टक्के केला होता. तर मुडीज इन्व्हेस्टर्सनेही ५.८ टक्क्यांवरुन घटवून तो ५.६ टक्के केला आहे. 

'शिवाजी नाही छत्रपती शिवाजी महाराज म्हणा'

एचटीने दिलेल्या वृत्तानुसार, संघाने मागील महिन्यात अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत हा मुद्दा समोर आणला होता. संघाच्या दृष्टीने ग्रामीण अर्थव्यवस्थेवर लक्ष केंद्रीत केल्यामुळे जागतिक मंदीचे परिणाम भारतावर कमी होतील, असे एका संघाशी निगडीत व्यक्तीने सांगितले.

या वर्षीच्या सुरुवातीला संघ आणि त्यांच्या सहयोगींनी सीतारामन यांच्या 'गाव, गरीब आणि शेतकरी' नीतीच्या अर्थसंकल्पातील घोषणेचे (५ जुलै) मोठे कौतुक केले होते. 

अयोध्या प्रकरणः डिसेंबरमध्ये दाखल होणार पुनर्विचार याचिका

अहवालात पुढे म्हटले आहे की, लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर भत्ता दिला जावा. त्याचबरोबर कर्जमाफीसारख्या त्वरीत व्यवस्थांऐवजी शेतकऱ्यांना आत्मनिर्भर होण्यासाठी आणि फायदेशीर शेती करण्यासाठी दीर्घकालिक नीतिगत कार्य झाले पाहिजे, अशी सूचना संघातील सहकाऱ्यांनी दिली आहे.

धक्कादायक!, शाळेत विद्यार्थिनींचे लेगिन्स काढले