पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

लोकसंख्या नियंत्रणासाठी दोन मुलांचं धोरण आवश्यक- भागवत

सरसंघचालक मोहन भागवत

भारतात दोन अपत्य जन्माला घालण्यासंबंधीचा कायदा येणं गरजेचं आहे असं मत सरसंघचालक मोहन भागवत यांनी मांडलं आहे. शुक्रवारी उत्तर प्रदेशातील मुरादाबाद या ठिकाणी झालेल्या संघाच्या एका कार्यक्रमात मोहन भागवत बोलत होते. 

दानवेंचे जावई हर्षवर्धन जाधव राज ठाकरेंच्या भेटीसाठी 'कृष्णकुंज'वर

आम्ही गेल्या काही काळापासून यावर विचार करत आहोत, जोडप्यांनी किती अपत्यांना जन्म  द्यावा यासंबधी एक धोरण असलं पाहिजे. मात्र यावर केंद्रानं विचार करुन योग्य तो निर्णय घ्यावा, असं मोहन भागवत म्हणाले. या कार्यक्रमासाठी माध्यमांच्या प्रतिनिधींना उपस्थित राहण्याची परवानगी नव्हती. मात्र एका कार्यकर्त्यानं लोकसंख्या नियंत्रणाबाबत विचारण्यात आलेल्या प्रश्नाचं उत्तर देताना मोहन भागवत यांनी हे मत मांडलं असल्याची माहिती उपस्थित असलेल्या एका व्यक्तीनं नाव न सांगण्याच्या अटीवर दिली असल्याचं समजत आहे. 

साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद;शिर्डीकरांच्या बंदला २५ गावांचा पाठिंबा

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी भागवतांच्या दोन अपत्य धोरणावर टीका केली आहे. ''सरसंघचालक मोहन भागवत हे दोन मुलांचं धोरण राबवू पाहत आहे. मात्र त्यांना कदाचित माहिती नसावं की महाराष्ट्रात यासंबधी अनेक कायदे आहेत. तसेच ते अन्य राज्यांतही आहेत. जर भागवतांना बळजबरीनं पुरुषांची नसबंदी करायची असल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी  असा कायदा जरूर लागू करू शकतात, मात्र याचे परिणाम काय झाले होते ते आपण भूतकाळात पाहिले होते', असं नवाब मलिक म्हणाले. 

ट्रम्प फेब्रुवारीत भारतात, गुजरातमध्ये 'हाऊडी मोदी'सारखा कार्यक्रम