पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

गेल्या नऊ वर्षांत स्वयंसेवक संघाचा वेगाने विकास, शाखा वाढल्या

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

गेल्या नऊ वर्षांत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा अत्यंत वेगाने विस्तार आणि विकास झाला आहे. संघामध्ये नव्या २० हजार शाखा सुरू झाल्याची माहिती संघाचे सहसरकार्यवाह मनमोहन वैद्य यांनी दिली. 

ट्रोल करणाऱ्या नेटकऱ्यावर मितालीचा शाब्दिक मारा

ते म्हणाले, २०१० पासून संघाच्या १९५८४ नव्या शाखा सुरू झाल्या. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या इतिहासात हा सर्वाधिक मोठा विस्तार आहे. सध्या देशात संघाच्या ५७ हजार शाखा आहेत. सध्याच्या काळात दैनंदिन जगणे अत्यंत धावपळीचे होत असताना संघ शाखा भरविणे वाटते तितके सोपे नक्कीच नाही. पण त्यातही २०१० ते २०१४ या काळात संघाच्या ६००० नव्या शाखा सुरू झाल्या. वर्षाला १५०० या गतीने नव्या शाखा सुरू होत गेल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची सर्वोच्च समिती असलेल्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाची तीन दिवसीय बैठक भुवनेश्वरमध्ये सुरू झाली. त्यापूर्वी आयोजित पत्रकार परिषदेत मनमोहन वैद्य बोलत होते. संघाच्या शाखांमध्ये येणारे ६० टक्के स्वयंसेवक हे महाविद्यालय आणि शाळेत शिक्षण घेणारे आहेत. २९ टक्के स्वयंसेवक हे तरूण व्यावसायिक आणि व्यापारी आहेत, असेही त्यांनी सांगितले.

मोदीजी, परळीला येताना हेलिकॉप्टरऐवजी रस्त्यानं याः धनंजय मुंडे

लोकांमध्ये संघाबद्दलची आवड वाढू लागली आहे. जेव्हा आम्ही संघामध्ये सहभागी व्हा, अशी मोहिम आमच्या वेबसाईटवर २०१३ मध्ये सुरू केली होती. त्यावेळी आमच्याकडे २८८४३ अर्ज आले होते. यावर्षी सप्टेंबर महिन्यापर्यंत आमच्याकडे एक लाख तीन हजार अर्ज आले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.