पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

संघ 'डिजिटल'!, मोहन भागवतांसह अनेक नेते टि्वटरवर

मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रमुख (आरएसएस) मोहन भागवत यांनी सोमवारी सकाळी सोशल मीडियावर प्रवेश केला आहे. मोहन भागवत यांनी टि्वटरवर अधिकृरित्या एंट्री केली आहे. अद्याप त्यांनी एकही टि्वट केलेले नाही. पण त्यांच्या सोशल मीडियावरील प्रवेशाची चर्चा मात्र जोरात सुरु झाली आहे. @DrMohanBhagwat हे त्यांचे अधिकृत टि्वटर अकांऊट आहे.

बंगालमध्ये काय सुरु आहे? मोहन भागवतांचा संतप्त सवाल

फक्त मोहन भागवतच नव्हे तर संघाचे अनेक दिग्गज नेत्यांनी टि्वटरवर आजपासूनच प्रवेश केला आहे. यामध्ये सह-सरकार्यवाह सुरेश सोनी, कृष्ण गोपाल, अरुण कुमार, अनिरुद्ध देशपांडे यांचा समावेश आहे. या सर्व नेत्यांनी सोमवारी टि्वटरवर एंट्री केली आहे. विशेष म्हणजे यापैकी कोणीही अद्याप टि्वट केलेले नाही.

यापूर्वी, संघाचे एक अधिकृत टि्वटर अकाऊंट आहे. त्याच अकाऊंटवरुन संघाकडून अधिकृत वक्तव्य केले जाते किंवा भागवत यांचे निवेदन शेअर केले जात असत.

राष्ट्रभक्तीचा दिखावा नकोः मोहन भागवत

गेल्या काही दिवसांपासून संघाकडून जनतेशी थेट जोडले जाण्याचा आणि आपली प्रतिमा बदलण्याचा प्रयत्न केला जात आहे. गेल्या वर्षी दिल्लीतील विज्ञान भवन येथे संघाने एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सलग तीन दिवस हा कार्यक्रम होता. यामध्ये भागवत यांनी थेट लोकांच्या प्रश्नांचे उत्तर दिले होते. यात त्यांनी संघाची विचारधारा, रणनिती आणि युवकांप्रती असलेले विचार सांगितले होते.

सरसंघचालकांच्या नावाने सोशल मीडियावर अनेक बनावट अकाऊंट असल्याचे आम्हाला दिसून आले. या बनावट अकाऊंटवरुन खोट्या पोस्ट टाकल्या जात, असे संघाच्या एका नेत्याने सांगितले.