पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तबलिगी जमातीबाबत मोहन भागवत म्हणाले...

सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी कोरोनाचा वाढता प्रकोप आणि तबलिगी जमातीविरोधात सुरु असेल्या विचारांवरुन देशवासियांना सावध केले. त्यांनी संघाच्या ऑनलाइन बौद्धिक वर्गात म्हटले की, देशाची १३० कोटी लोकसंख्या भारतमातेची संतान आहेत, ते आपले भाऊबंद आहेत. हे लक्षात ठेवले पाहिजे. दोन्हींकडून कोणताही राग किंवा भीती नसायला हवी. 

'ना'पाक डाव; ४५० दहशतवादी भारतात घुसण्याच्या तयारीत

ते पुढे म्हणाले, संघाचे काम लॉकडाऊनमध्येही सुरु आहे. दैनंदिन कामे बंद आहेत. परंतु, दुसऱ्या कामांनी याची जागा घेतली आहे. कोरोना महामारी नाही. त्याचा हाहाकार माजला आहे. परंतु, त्यामुळे घाबरुन जाण्याची गरज नाही. काय काय करायला हवे यासाठी थंड डोक्याने योजना बनवायला हव्यात. भयापासून दूर होऊन सुनियोजितपणे प्रयत्न केले पाहिजेत. 

३ मे नंतरही लॉकडाऊन?, अनेक राज्ये कालावधी वाढण्यास तयार

जर कोणी भीतीने किंवा क्रोधाने काही उलटसुलट केले तर साऱ्या समाजाने त्याच्यापासून अंतर राखले पाहिजे. त्यांचा इशारा तबलिगी जमातीकडे होता. ते पुढे म्हणाले की, भडकवणारे कमी नाहीत. त्याचा फायदा घेणाऱ्या शक्तीही आहेत. ज्या पद्धतीने देशात कोरोनाचा फैलाव झाला आहे. त्याचे हेही एक कारण आहे. यावेळी त्यांनी पालघर घटनेवर दुःख व्यक्त केले.