पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राष्ट्रभक्तीचा दिखावा नकोः मोहन भागवत

सरसंघचालक मोहन भागवत

राष्ट्रभक्तीची भावना दिखाव्यासाठी नव्हे तर तुमच्या अंतर्मनात असली पाहिजे. ती अभियानात्मक न होता दैनंदिन जीवनात तिचा समावेश असला पाहिजे. जीवनाचा प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी समर्पित असायला हवा, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. ते नवाबगंज येथील दीनदयाल उपाध्याय सनातन धर्म महाविद्यालयात स्वयंसेवकांच्या प्रशिक्षण वर्गात बोलत होते. 

RSS प्रमुख भागवत म्हणाले, राम का काम करना है !

सशक्त भारत पाहायचा असेल तर काही मिळवण्यासाठी काही संकल्पही करावे लागतात. राष्ट्र निर्माणासाठी अनेक गोष्टींना नकार द्यावा लागणार आहे. समाजातील प्रत्येक घटक स्वस्थ आणि संपन्न राहायला हवा. हे तेव्हाच शक्य आहे, जेव्हा प्रत्येक युवकाच्या हाती रोजगार असेल, असे ते म्हणाले. 

सुप्रीम कोर्टच्या आदेशाची गरज नाही, राम मंदिरांची उभारणी सुरु करा- सुब्रमण्यम स्वामी

सुदृढ भारतासाठी गाव-खेड्यापर्यंत शाखांचा विस्तार झाला पाहिजे. जेव्हा राष्ट्रवादाचे महत्व शेतापासून ते अपार्टमेंटपर्यंत पोहोचवली जाईल तेव्हाच भारत चहुबाजूंनी विकसित होईल, असेही त्यांनी म्हटले.