पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जम्मू-काश्मीरचे कलम ३७० हटविण्याचा निर्णय साहसी - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ

मोहन भागवत

गेल्या अनेक वर्षांपासून केवळ चर्चेच्या पातळीवर राहिलेला निर्णय केंद्रातील भाजपच्या नेतृत्त्वाखालील सरकारने सोमवारी घेतला. जम्मू-काश्मीरमधील ३७० कलम हटविण्यात आले असून या राज्याची दोन भागांत विभागणी करण्यात आली आहे. लडाख हा नवे केंद्रशासित प्रदेश करण्यात आला असून, जम्मू-काश्मीर हा सुद्धा केंद्रशासित प्रदेश असणार आहे. अत्यंत मूलभूत आणि दूरगामी परिणाम करणाऱ्या या निर्णयावर विविध राजकीय पक्षांनी वेगवेगळ्या स्वरुपाच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. जम्मू-काश्मीरची दोन भागांत विभागणी करण्याचा केंद्राचा निर्णय साहसी असल्याचे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी म्हटले आहे.

कलम 370: केंद्राकडून लष्कर आणि वायूदलाला हाय अलर्ट जारी

सरकारच्या निर्णयानंतर मोहन भागवत म्हणाले, आम्ही सरकारच्या साहसी पावलाचे स्वागत करतो. पूर्ण देशासह जम्मू-काश्मीरच्या भल्यासाठी या निर्णयाची गरज होती. वैयक्तिक आणि राजकीय पक्षाचा विचार न करता प्रत्येकाने या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. 

हा क्रांतीकारक नव्हे तर राजकीय निर्णयः सोली सोराबजी

दरम्यान, भाजपच्या जम्मू-काश्मीरमधील प्रदेश कार्यकारिणीने सरकारच्या या ऐतिहासिक निर्णयाचे स्वागत केले आहे. जम्मू-काश्मीरमधील लोकांचे दुःख कमी केल्याबद्दल आम्ही सर्वजण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो. जम्मू-काश्मीरमधील भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र रैना म्हणाले, आपली जात, पंथ आणि धर्म हे सर्व बाजूला ठेवून प्रत्येकाने या निर्णयाचे स्वागत केले पाहिजे. जम्मू-काश्मीरसाठी हा एक ऐतिहासिक क्षण आहे. २०१४ मध्ये जेव्हा राज्यातील जनता महापूराचा सामना करीत होती. त्यावेळी राज्यात येऊन काश्मीरमधील लोकांना भेटणारे नरेंद्र मोदी पहिले पंतप्रधान होते. त्यांनी राज्यातील लोकांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रयत्न केले.
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:rss chief mohan bhagwat reacts on article 370 from jammu kashmir says its a courageous step by govt