पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

राम मंदिर निकालाच्या पार्श्वभूमीवर नोव्हेंबरमधील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यक्रम तूर्त रद्द

राम मंदिरप्रश्नी नोव्हेंबरमध्ये निकाल येणार आहे

अयोध्येतील रामजन्मभूमी-बाबरी मशिद प्रकरणी सर्वोच्च न्यायालय १७ नोव्हेंबरपूर्वी अंतिम निकाल देणार असल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने नोव्हेंबरमधील आपले सर्व नियोजित कार्यक्रम तूर्त रद्द केले आहेत. केंद्रीय पदाधिकाऱ्यांचा नोव्हेंबर आणि डिसेंबरमधील विविध जिल्ह्यांधील प्रवासही स्थगित करण्यात आला आहे. 

भाजपच्या विधीमंडळ नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड

१७ नोव्हेंबरपासून लखनऊमध्ये तीन दिवसांचा एक कार्यक्रम स्वयंसेवक संघाकडून आयोजित करण्यात आला होता. तो सुद्धा रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत हे सुद्धा उपस्थित राहणार होते. विश्व हिंदू परिषदेनेही आपले सर्व कार्यक्रम स्थगित केले आहेत.

मालेगाव बॉम्बस्फोट: समीर कुलकर्णींना सुरक्षारक्षकांचे कवच

उदयपूरला संघ पदाधिकाऱ्यांच्या प्रांतीय बैठकीतही मोहन भागवत उपस्थित राहणार होते. पण ही बैठकही आता रद्द करण्यात आली आहे. त्याचबरोबर हरिद्वारमधील ४ नोव्हेंबरपर्यंत चालणारा कार्यक्रमही रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला सरसंघचालकांसह भैय्याजी जोशी, दत्तात्रेय होसाबळे उपस्थित राहणार होते.