पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

मायावतींच्या भावाची ४०० कोटींची संपत्ती प्राप्तिकर विभागाकडून जप्त

मायावती

बसपच्या सर्वेसर्वा मायावती यांचा भाऊ आणि त्याची पत्नी यांची ४०० कोटी रुपयांची संपत्ती गुरुवारी प्राप्तिकर विभागाने जप्त केली. ४०० कोटी रुपयांचे बाजारमूल्य असलेली जमीन प्राप्तिकर विभागाने जप्त केली आहे.

'काँग्रेस-राष्ट्रवादीचे काही आमदार याच आठवड्यात राजीनामा देतील'

एकूण सात एकर असलेल्या या जमिनीची जप्ती करण्याचे अंतरिम आदेश दोन दिवसांपूर्वीच जारी करण्यात आले होते. ही जमीन थेटपणे मायावती यांचा भाऊ आनंद कुमार आणि त्यांची पत्नी विचितर लता यांच्या नावावर नसली, तर तेच त्याचे उपभोक्ते आहेत. काही दिवसांपूर्वीच मायावती यांनी आनंद कुमार यांची बहुजन समाज पक्षाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती केली होती. बेनामी संपत्ती व्यवहार कायदा, १९८८ मधील कलम २४(३) नुसार प्राप्तिकर विभागाने ही संपत्ती जप्त केली आहे. 

प्राप्तिकर विभागाने जप्त केलेली संपत्ती ही बेनामी असून, त्याचा आकार २८,३२८.०७ चौरस मीटर अर्थात सात एकर आहे.