पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्याला ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास होणार

चार महिला डॉक्टर निलंबितचार महिला डॉक्टर निलंबित (प्रतिकात्मक छायाचित्र)

वैद्यकीय सेवा देणाऱ्या कोणत्याही कर्मचाऱ्यावर हल्ला करणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. डॉक्टर तसेच वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांवरील हल्ला हा अजामीनपात्र गुन्हा असून हल्लेखोरांवर कठोर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी बुधवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.  

कोरोनाशी लढा: डॉक्टरांना मिळणार सुरक्षा, गृहमंत्र्यांचे आश्वासन

प्रकाश जावडेकर म्हणाले की, वैद्यकीय सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्याची चौकशी ३० दिवसांमध्ये करुन या प्रकरणात योग्य ती कारवाई करण्याची तरतूद करण्यात नव्या कायद्यामध्ये करण्यात आली आहे. शिक्षेसह गुन्हेगाराला दोन लाखांच्या दंड भरावा लागेल. गंभीर स्वरुपाच्या प्रकरणात ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास तर ५ लाख रुपये दंडाची कारवाई केली जाईल, अशी माहितीही जावडेकरांनी दिली. यासंदर्भातील आदेश जारी करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.  

कोरोनाच्या भीतीमुळे ४० टक्के लोक ६ महिने हवाई प्रवास टाळणार

जगभरासह भारतावरही सध्या कोरोना विषाणूचे संकट घोंगावत आहे. देशावरील ओढावलेल्या संकटाचा सामना करत असलेल्या डॉक्टर तसेच कर्मचारी वर्गावर हल्ला करण्यात आल्याच्या काही घटना समोर आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी इंडियन मेडिकल असोसिएशनच्या डॉक्टरांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मसंवाद साधला होता. देशातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांच्या सुरक्षा देण्याचे आश्वासन दिले होते. डॉक्टरांवर होणाऱ्या हल्ल्यांच्या पार्श्वभमीवर इंडियन मेडिकल असोसिएशनने (आयएमए) २३ एप्रिल रोजी काळा दिवस म्हणून निषेध नोंदवण्याची घोषणा केल्यानंतर केंद्राने वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर पाउल उचलले आहे.