पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तुमचा जामीन रद्द का करु नये, कोर्टाचा रॉबर्ट वाड्रांना सवाल

रॉबर्ट वाड्रा (PTI File Photo)

मनी लाँड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांसमोरील अडचणी वाढू शकतात. दिल्ली उच्च न्यायालयाने वाड्रांना दिलेला जामीन रद्द करण्याचा ईडीच्या याचिकेवर १७ जुलैपर्यंत उत्तर मागितले आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने वाड्रांचे निकटवर्तीय मनोज अरोरा यांचाही जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर उत्तर मागितले आहे. 

उच्च न्यायालयाने मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन रद्द करण्याप्रकरणी हे उत्तर मागितले आहे. ईडीने जामीन रद्द करण्यासाठी खालच्या न्यायालयाच्या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. आता याप्रकरणी पुढील सुनावणी ही १७ जुलैला होणार आहे.

... यामुळे प्रियांका गांधींचा मुलगा रेहानने केले नाही मतदान

तुमचा जामीन रद्द का करु नये असा सवाल दिल्ली उच्च न्यायालयाने वाड्रांना नोटिसीत विचारला आहे. ईडीला त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे. 

दरम्यान, मनी लाँड्रिंगप्रकरणी दिल्लीच्या खालच्या न्यायालयाने वाड्रानां जामीन दिला होता. या निर्णयाविरोधात ईडीने उच्च न्यायालयात अपील केले होते. न्या. चंद्रशेखर यांनी याची सुनावणी केली. 

लोकशाही वाचविण्यासाठी ही निवडणूक महत्त्वाची : प्रियांका गांधी

सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी न्यायालयासमोर ईडीची बाजू मांडली. वाड्रा हे चौकशीदरम्यान सहयोग करत नाहीत. त्यामुळे त्यांना ताब्यात घेणे अत्यंत आवश्यक आहे. त्यांना ताब्यात घेऊन चौकशी करायची आहे, असे म्हटले. याप्रकरणी चार्जशीटही अद्याप दाखल केले नसल्याचे त्यांनी न्यायालयाला सांगितले. त्यानंतर न्यायालयाने वाड्रांना नोटीस जारी करुन १७ जुलैपूर्वी उत्तर देण्यास सांगितले आहे.