पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सीसीटीव्ही रेकॉर्डर समजून चोरट्यांनी सेटटॉप बॉक्सच पळवला

सीसीटीव्ही रेकॉर्डर समजून चोरट्यांनी सेटटॉप बॉक्सच पळवला

पिस्तुलधारी चार युवकांनी दिल्लीतील एका सराफाचे दुकान लुटल्याची घटना नुकतीच घडली. चोरट्यांनी या दुकानातून तब्बल २६ लाखांचा ऐवज लुटला. ही घटना दिल्लीतील बेगमपूर येथे शनिवारी दुपारी घडली. विशेष म्हणजे सीसीटीव्हीचे डिजीटल रेकॉर्डर समजून चोरट्यांनी चक्क सेटटॉप बॉक्स सोबत नेला. चोरट्यांचा हा सर्व प्रताप सीसीटीव्हीत कैद झाला असून त्याचे फुटेज आता पोलिसांकडे आहेत. पोलिसांकडे असलेल्या सीसीटीव्हीच्या डीव्हीआरमध्ये चारही चोरट्यांचे चेहरे स्पष्ट दिसत आहेत. 

सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन चोरट्यांना शोधणे सोपे जाणार असल्याचे रोहिणी विभागाचे पोलिस उपायुक्त एस डी मिश्रा यांनी सांगितले.

अशा वातावरणात दिल्लीत राहू शकत नाहीः अरविंद सावंत

ही घटना शनिवारी दुपारी दीडच्या सुमारास घडली. दुकानमालक गुलशन हे एकटेच आपल्या दुकानात बसले होते. सुरुवातीला दोन व्यक्ती ग्राहक म्हणून दुकानात आले आणि दागिन्यांबाबत चर्चा सुरु केली. त्यानंतर आणखी दोन व्यक्ती आले. या चौघांपैकी कोणीही आपला चेहरा झाकला नव्हता. 

यापैकी तिघांकडे पिस्तुल होते. पिस्तुलच्या धाकावर त्यांनी दुकानमालकाला चोप देत दुकानातील दागिने घेऊ लागले. त्यातील एकाने दुकानातील रोख रक्कम ही हिसकावून घेतली. चोरटे २५ लाखांचे दागिने आणि एक लाखांची रोकड घेण्यात यशस्वी झाली. दुकानातील लॉकर उघडता न आल्याने आणखी मोठी चोरी टळली.

दुपारी ४ नंतर काँग्रेसचा अंतिम निर्णयः मल्लिकार्जुन खर्गे

या चौघा चोरट्यांपैकी दोघांना अचानक दुकानात सीसीटीव्ही दिसला. त्यांनी लगेच सीसीटीव्हीचा डीजीटल रेकॉर्डर शोधण्यास सुरुवात केली. त्याचवेळी त्यांना एक उपकरण दिसले. ते उपकरण सीसीटीव्हीचे रेकॉर्डरच आहे असे समजून त्यांनी उचकटून आपल्याबरोबर नेले. पण चोरट्यांनी जे उपकरण आपल्यासोबत नेले ते रेकॉर्डर नव्हे तर तो सेटटॉप बॉक्स होता.