लोकसभा निवडणुकीतील मानहानीकारक पराभवानंतर बिहारमध्येही आता जबाबदर नेत्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरु लागली आहे. राजदचे विद्रोही नेत्याने लालू प्रसाद यादव यांचा मुलगा आणि विरोधीपक्षनेते तेजस्वी यादव यांच्यावर निशाणा साधला आहे. विद्रोही नेता महेश यादव यांनी तेजस्वी यादव यांनी विरोधीपक्ष नेतेपद सोडावे, अशी मागणी केली आहे.
लोक घराणेशाहीच्या राजकारणाला कंटाळले आहेत. राजदमध्ये काही आमदारांची घुसमट होत आहे, असे महेश्वर यादव यांनी म्हटले आहे. लोकसभा निवडणुकीत जनता दलाला खातेही उघडता आले नाही. निवडणुकीपूर्वी राजद पक्ष एनडीएला टक्कर देण्यासाठी प्रमुख भूमिका निभावेल अशी चर्चा रंगली होती. मात्र राजदला सपशेल अपयश आले.
काँग्रेसच्या आणखी दोन प्रदेशाध्यक्षांचे राजीनामे
मुझफ्फरपूर जिल्ह्यातील गायघाटचे आमदार महेश यादव यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत तेजस्वी यादव यांच्यावर टीका केली. घराणेशाहीमुळे राजद पक्ष रसातळाला चालला आहे. यावेळी त्यांनी राबडीदेवी यांचे मुख्यमंत्रीपद पासून तेजस्वी यादव यांची मुख्यमंत्रीपदी दिलेली संधी याचे दाखले देत राजदमध्ये सुरु असेलेल्या घराणेशाहीवर टीका केली. सत्ता गेल्यानंतरही तेजस्वी यादव यांना विरोधी नेतेपदी निवण्यात आल्याचा उल्लेखही त्यांनी यावेळी केला.
लोकसभेच्या निकालानंतर लालूप्रसाद यादव यांची तब्येत बिघडली
तेजस्वी यादव यांना पदावरुन हटवण्यात आले नाही तर राजदचा पुढील प्रवास बिकट होईल. बिहार विधानसभेच्या निवडणुकीत नितिश कुमार यांच्यासोबतच्या आघाडीमुळे फायदा झाला. अन्यथा विधानसभा निवडणुकीतही राजदला एवढ्या जागा मिळाल्या नसत्या. उल्लेखनिय आहे की, लोकसभा निवडणुकीत बिहारमध्ये महाआघाडीने ४० जागा लढवल्या होत्या. यात काँग्रेसला एक जागा मिळाली तर राजदला खातेही उघडता आले नव्हते. राजद एकूण १९ जागावर लढले होते. त्यांना केवळ १५.७६ टक्के मतदान मिळाले.