पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हैदराबाद विमानतळावरील ढिसाळ कारभारचा व्हिडिओ रितेश देशमुखनं केला ट्विट

हैदराबाद विमानतळ

अभिनेता रितेश देशमुखनं हैदराबाद विमानतळावरील ढिसाळ कारभाराचा  व्हिडिओ ट्विट करत आपली नाराजी व्यक्त केली आहे.  विमानतळाच्या लॉनवर अचानक वीज गेल्यानं  प्रवाशांची मोठी गैरसोय झाली, यावेळी सुरक्षायंत्रणेनं दाखवल्या उदासीनतेवर रितेशनं टीका केली आहे. 

'आम्ही हैदराबाद विमानतळाच्या लॉनवर होतो. अचानक विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं जाण्या-येण्यासाठी वापरण्यात येणारी लिफ्टही बंद पडली. बाहेर पडण्यासाठी  एकमेव  दरवाजा होता जो साखळीनं बंद करण्यात आला होता. जर आपातकालीन परिस्थिती उद्भवली असती तर  काय केलं असतं? असा सवाल विचारत त्यानं विमानतळावरचा  व्हिडिओ ट्विट केला आहे. 

'या गोंधळात अडकलेल्या प्रवाशांची  फ्लाइट सुटली असती, मात्र  सुरक्षाअधिकाऱ्यांनी दरवाजा उघडण्याची परवानगी दिली नाही. आपातकालीन  परिस्थितीत अशा प्रकारे बाहेर जाण्याचा दरवाजा  कोणीही बंदी करू शकत नाही. आता तरी जागे व्हा' असं  म्हणत रितेशनं इथल्या ढिसाळ कारभाराचा व्हिडिओ शेअर करत नाराजी दर्शवली आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Riteish Deshmukh Hyderabad Airport Lounge Security personnel refuses to give permission to open the door