पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

... म्हणून आंदोलकांना आता धडकी भरली, उत्तर प्रदेश मुख्यमंत्री कार्यालयाचे ट्विट्स

योगी आदित्यनाथ

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात हिंसक आंदोलन करणाऱ्या प्रत्येकाला उत्तर प्रदेशमधील राज्य सरकारने केलेल्या कारवाईमुळे धडकी भरली असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून म्हणण्यात आले आहे. हिंसक आंदोलन करणाऱ्यांवर करण्यात आलेल्या कारवाईवर काहींनी टीकाही केली आहे. पण मुख्यमंत्री कार्यालयाकडून या कारवाईचे समर्थन करण्यात आले.

दिल्ली गारठली; २.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद

हिंदीमधून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हणण्यात आले आहे की, हिंसक आंदोलन करणाऱ्या प्रत्येक आंदोलकाला सरकारने केलेल्या कारवाईमुळे धडकी भरली आहे. आपण अशा पद्धतीने कृती करून खूप मोठी चूक केली असल्याचे त्याला वाटते आहे, असे एका ट्विटमध्ये म्हटले आहे. 

सरकारच्या कडक कारवाईमुळे हिंसा करणाऱ्यांना धक्काच बसला आहे. त्यामुळेच त्यांनी आता शांत राहणे पसंद केले आहे. ज्यांनी सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केले आहे. त्यांच्याकडूनच त्याची वसुली केली जाईल, असे योगी आदित्यनाथ यांनी आधीच जाहीर केले आहे. हिंसाचार करणाऱ्या प्रत्येकावर आता अक्षरशः रडण्याची वेळ आली आहे. कारण उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांचे सरकार आहे, असे अन्य एका ट्विटमध्ये म्हटले आहे.

पुणे मेट्रोच्या कोचचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण

मुख्यमंत्री कार्यालयाच्या ट्विटर हँडलवरून करण्यात आलेल्या या प्रत्येक ट्विटमध्ये TheGreat_CMYogi असा हॅशटॅगही देण्यात आला आहे. उत्तर प्रदेशात या कायद्याविरोधात अनेक ठिकाणी हिंसक आंदोलन झाले होते. त्यापार्श्वभूमीवर उत्तर प्रदेश पोलिसांनी एकूण ४९८ जणांवर सार्वजनिक संपत्तीचे नुकसान केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. आता या सर्वांची संपत्ती लवकरच जप्त करण्यात येईल, असे सरकारने म्हटले आहे. हिंसाचार करणाऱ्यांची वैयक्तिक संपत्ती जप्त करून त्यातूनच सार्वजनिक मालमत्तेचे झालेल नुकसान भरून घेतले जाईल, असे योगी आदित्यनाथ यांच्या सरकारने आधीच म्हटले आहे.