पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कुराण'च्या प्रती दान करण्याचा कोर्टाचा आदेश, तरुणी म्हणते...

रिचा भारती

सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक तेढ निर्माण करण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या तरुणीने कोर्टाच्या आदेशावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत पुन्हा धार्मिकतेचा मुद्यावर भाष्य केले. सोशल मीडियाच्या माध्यमातून धार्मिक भावना दुखावल्या प्रकरणाच्या आरोपात अटक करण्यात आलेल्या रुचा भारती या तरुणीला रांची न्यायालयाने सोमवारी जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने तिला ५ कुराण शाळा, विद्यालय किंवा महाविद्यालयात दान करण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. कोर्टाच्या या आदेशावर रिचाने प्रतिक्रिया दिली आहे. 

या सारख्या प्रकरणात दुसऱ्या समुदायाच्या लोकांना हनुमान चालीसाची पुस्तिका दान करण्याबाबत आदेश का दिले जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत तिने न्यायालयाच्या आदेशानंतरही धार्मिक मुद्याला हात घालत नवा वाद निर्माण करणारे भाष्य केले आहे.  

उल्लेखनिय आहे की, सोमवारी न्याय दंडाधिकारी मनीष कुमार सिंह यांच्या न्यायालयाने आरोपी युवतीच्या याचिकेवर सुनावणी केली होती. सुनावणीमध्ये न्यायालयाने म्हटले होते की, तुम्हाला पाच कुराण दान करावी लागतील. यातील एक कुराण याप्रकरणातील अंजुमन समितीच्या मंसूर खलीफा यांना तर बाकीच्या चार प्रती शाळा, महाविद्यालय किंवा विद्यापीठामध्ये दान स्वत: जावून दान कराव्या, असे न्यायालयाने म्हटले होते.   

पिठोरियातील अंजुमन समितीचे मंसूर खलीफा यांनी धार्मिक भावना भडकवल्याप्रकरणी पिठोरिया पोलिसात १२ जुलै २०१९ रोजी रिचा भारती विरोधात तक्रार दाखल केली होती. त्याच दिवशी तरुणीला अटक करण्यात आले होते.  
 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title: richa bharti on direction by a ranchi court to distribute 5 copies of quran as condition for bail for posting an allegedly communal post on social media