पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अनैतिक संबंधांच्या संशयावरून सासऱ्याचा सूनेवर आणि पत्नीवर हल्ला, दोघींचा मृत्यू

दिल्लीत सासऱ्याकडून सुनेचा आणि पत्नीचा खून

सुनेचे बाहेर कोणाशी तरी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून सासऱ्याने तिचा आणि आपल्या पत्नीचा खून केल्याची घटना दिल्लीमध्ये शुक्रवारी घडली. संबंधित आरोपी सासरा हा निवृत्त शिक्षक असून, त्यांचे वय ६२ वर्षे आहे. दिल्लीतील रोहिणीमध्ये ही घटना घडली. या प्रकरणी सासरा सतीश चौधरी यांना पोलिसांनी अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश यांचा आपल्या पत्नीवरही तिचे अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. या प्रकरणी मृत पावलेल्या सुनेचे नाव प्रज्ञा चौधरी तर पत्नीचे नाव स्नेहलता चौधरी असे आहे. विशेष म्हणझे प्रज्ञा ही एका विमान कंपनीत एअर हॉस्टेस म्हणून काम करीत होती. तिचा नवरा अभियंता असून तो सिंगापूरमध्ये नोकरी करतो. ज्या वेळी ही घटना घडली त्यावेळी तो घरी नव्हता.

उन्नावमध्ये जाळण्यात आलेल्या बलात्कार पीडितेचा उपचारांवेळी मृत्यू

शुक्रवारी पहाटे पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. आपल्या हातात चाकू घेऊन सतीश प्रज्ञाच्या खोलीत गेले. तिच्यासोबत तिच्या सासुबाई स्नेहलता या सुद्धा झोपल्या होत्या. सोबत तिची तीन वर्षांची मुलगी आणि एक वर्षांचा मुलगा हे सुद्धा तिथे झोपले होते. पहाटेच्या सुमारास प्रज्ञा जागी असल्याचे पाहून सतीश यांना राग आला. त्यामुळे दोघांमध्ये वादावादी झाली. यानंतर सतीश यांनी हातातील चाकूने प्रज्ञावर हल्ला केला. तिने आरडाओरडा सुरू केल्यावर स्नेहलता जाग्या झाल्या. त्यांनी आपल्या नवऱ्याला थांबविण्याचा प्रयत्न केला. यावेळी सतीश यांनी पत्नीवरही चाकूने हल्ला केला. 

प्रज्ञा आणि स्नेहलता यांच्या ओरडणे ऐकून सतीश यांचा धाकटा मुलगा सौरभ पळत पळत त्या खोलीत गेला. यावेळी सतीश यांनी त्याच्यावरही हल्ला केला. त्यानंतर सौरभने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सतीश यांना एका खोलीत बंद करण्यात यश मिळवले. सौरभने शेजाऱ्यांना या घटनेबद्दल माहिती दिली. शेजाऱ्यांनी लगेचच पोलिसांना कळवले. 

रोहिणीचे पोलिस उपायुक्त एस डी मिश्रा यांनी सांगितले की, पोलिस घटनास्थळी गेल्यावर त्यांनी आधी सतीश यांना अटक केली. त्यांच्याकडून चाकू जप्त करण्यात आला. प्रज्ञा आणि स्नेहलता यांना तातडीने उपचारांसाठी रुग्णालयात नेण्यात आले. पण तिथे उपचारांपूर्वीच डॉक्टरांनी त्या दोघींना मृत घोषित केले.

पुण्यात PM मोदींचं CM ठाकरेंकडून स्वागत तेही फडणवीसांच्या उपस्थितीत

प्रज्ञा आणि स्नेहलता यांचे सतत सतीश यांच्याशी भांडण होत होते. त्यामुळे त्या शुक्रवारीच गुरुग्रामला भाड्याच्या घरात राहायला जाणार होत्या. त्यापूर्वीच सतीश यांनी त्यांच्यावर हल्ला केला, अशीही माहिती पोलिसांनी दिली.