पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सरन्यायाधीशांविरोधात कट? निवृत्त न्यायाधीश करणार चौकशी

सर्वोच्च न्यायालय

सर्वोच्च न्यायालयाने सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्याविरोधातील लैंगिक शोषणाची तक्रार ही व्यापक कटाचा भाग आहे असे सांगणारे वकील उत्सव बैंस यांच्या दाव्याची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. निवृत्त न्यायाधीश एके पटनाईक हे याची चौकशी करतील. दिल्लीचे पोलिस आयुक्त, सीबीआयचे संचालक आणि आयबी प्रमुखांना सहकार्य करण्याचे निर्देशही सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. 

या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या तीन न्यायाधीशांचे खंडपीठ संतापलेले दिसले. या प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या न्या. अरुण मिश्रा, न्या. आर एफ नरिमन आणि न्या. दीपक गुप्ता यांच्या खंडपीठाने म्हटले की, निकाल निश्चित केले जातात असे आम्ही नेहमी ऐकत आलो आहोत. हे कोणत्याही परिस्थितीत बंद झाले पाहिजे.  

न्यायाधीश या नात्याने आम्ही खूप चिंतित आहोत, असे मत खंडपीठाने नोंदवले. न्या. मिश्रा म्हणाले की, श्रीमंत आणि तथाकथित प्रतिष्ठीत लोक देश आणि न्यायालयाला पैशांच्या जोरावर चालवू इच्छितात. आगीशी खेळू नका नाहीतर बोटं जळतील, असा इशारा ही त्यांनी दिला.