पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

किरकोळ महागाईत वाढ, खाद्य पदार्थांचे दरही वाढले

महागाई

लोकसभा निवडणुकीच्या दरम्यानच महागाईत वाढ झाली आहे. खाद्य पदार्थांच्या किमतींमध्ये वाढ झाल्यामुळे किरकोळ महागाईचा दर एप्रिलमध्ये वाढून २.९२ टक्के राहिला. तर मार्च महिन्यात महागाईचा दर हा २.८६ नोंदवण्यात आला होता. एप्रिल २०१८ मध्ये महागाई दर ४.५८ टक्के होता. 

सोमवारी केंद्रीय सांख्यिकी संघटनेकडून प्रसिद्ध करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, एप्रिलमध्ये फूड बास्केटची महागाई १.१ टक्के आणि मार्चमध्ये ०.३ टक्के होती. आरबीआय चलनविषयक धोरण निश्चित करताना प्रामुख्याने ग्राहक किंमत निर्देशांक लक्षात घेते. 

सलग नवव्या महिन्यापासून महागाई दर हा आरबीआयकडून निर्धारित लक्ष्य ४ टक्क्यांहून कमी आहे. तज्ज्ञांनी एप्रिलमध्ये महागाई दर हा २.९७ टक्के राहिल असा अंदाज व्यक्त केला होता.