पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

वटवाघुळामुळे मनुष्यात कोरोना विषाणू आला? ICMR ने दिले उत्तर

डॉ. रमण गंगाखेडकर

कोरोना विषाणू वटवाघुळात आढळून येतो. परंतु, तो वटवाघुळाचाच विषाणू आहे, मनुष्यात येऊ शकत नाही. वटवाघुळातून मनुष्यात विषाणू येण्याची घटना हजार वर्षांत एखाद्यावेळेस येण्याची शक्यता असते असे भारतीय चिकित्सा अनुसंधान परिषदेचे (आयसीएमआर) डॉ. रमण गंगाखेडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. 

देशातील १७० जिल्ह्यांवर हॉटस्पॉटचे संकट, आरोग्य मंत्रालयाची माहिती

ते पुढे म्हणाले की, दोन प्रकारचे वटवाघुळ असतात. त्यांच्यात कोरोना विषाणू आढळून आला आहे. परंतु, तो वटवाघुळाचाच विषाणू आहे. तो मनुष्यात येऊ शकत नाही. हजार वर्षांत एखाद्यावेळी असे होण्याची शक्यता असते. चीनमध्ये केलेल्या संशोधनात असे आढळून आले आहे की, वटवाघुळातून थेट मनुष्यात हा विषाणू आला असेल किंवा पेंगुलीन नावाच्या जनावराच्या माध्यमातून तो मनुष्यात आला असेल. 

'ईएमआयमधील सूट सहा महिन्यांपर्यंत वाढवण्याची गरज'

आयसीएमआरने सांगितले की, वटवाघुळाच्या विषाणूचा म्यूटेशन विकसित झाला आहे. त्यामुळे मनुष्याच्या आत क्षमता निर्माण झाली. हा असा विषाणू बनला असेल, जो मनुष्याच्या शरीरात जाऊन आजारी करण्यास सक्षम झाला असेल. अशा पद्धतीने हा विषाणू मनुष्यात आला असेल. 

या शोधासाठी वैज्ञानिकांनी भारताच्या १० राज्यातील दोन प्रजातीच्या वटवाघुळाचे नमुने घेतले होते. यामध्ये पिटरोपस आणि रोसेट्स प्रजातीच्या वटवाघुळाचे नमुने घेण्यात आले. वैज्ञानिकांना भारतातील १० राज्यांपैकी ४ राज्यातील वटवाघुळात कोरोना विषाणूची पुष्टी झाली. 

ममता सरकारला सत्तेतून बाहेर काढण्याची गरज, राज्यपालांचा निशाणा

केरळ, हिमाचल, तामिळनाडू आणि पाँडिचेरीमधील वटवाघुळांच्या नमुन्यात कोरोना विषाणूची पुष्टी मिळाली आहे. कर्नाटक, चंदीगड, ओडिशा, पंजाब, गुजरात, तेलंगणामधील वटवाघुळात कोरोना विषाणू आढळून आले नाहीत.