पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

जाणून घ्या प्रजासत्ताक दिनाचा इतिहास

प्रजासत्ताक दिन २०२०

आपण सारे भारतीय २६ जानेवारी हा दिन 'प्रजासत्ताक दिन' म्हणून साजरा करतो. यादिवशी स्वतंत्र्य भारताची पहिली राज्यघटना अंमलात आली. भारतात लोकशाहीचे एक नवे पर्व सुरू झाले म्हणून हा दिवस ‘प्रजासत्ताक दिन’ म्हणून ओळखला जातो. भारतावर २०० वर्षांहून अधिक काळ ब्रिटिशांनी राज्य केलं.  ब्रिटिशांच्या जोखडातून देश स्वातंत्र व्हावा यासाठी लाखो स्वतंत्र्य सैनिकांनी प्राणाची आहुती दिली.  

स्वातंत्र्यलढ्यानंतर ब्रिटीश राजवटीपासून भारत १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वातंत्र झाला मात्र देशाची राज्यघटना अस्तित्त्वात नव्हती.  भारताचे कायदे  हे ब्रिटीशांनी स्थापन केलेल्या कायद्याच्या सुधारित आवृत्तीवर आधारित होते. त्यामुळे स्वातंत्र्य दिनानंतर दोन आठवड्यांनंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भारतीय राज्यघटनेच्या मसुद्यासाठी मसुदा समिती नेमण्यात आली. या समितीत मोहम्मद सादुल्ला, बी. एल. मित्तर, एन. जी. अयंगार, ए. के. अय्यर, के. एम. मुन्शी, एन. माधवराव आणि, टी. टी. कृष्णम्माचारी यांची नेमणूक झाली. 
मसुदा समितीची पहिली बैठक ३० ऑगस्ट १९४७ रोजी झाली. २१ फेब्रुवारी १९४८ला समितीने संविधानाचा प्रथम मसुदा घटना परिषदेच्या अध्यक्षांना सादर केला. तो मसुदा आठ महिन्यांपर्यंत जनतेला चर्चेसाठी उपलब्ध होता. या आठ महिन्यांत मसुदा समितीचे कार्य चालूच होते.   त्यानंतर ४ नोव्हेंबर १९४८ रोजी तो घटना परिषदेपुढे चर्चेसाठी ठेवण्यात आला.

संविधानाचे पहिले वाचन ४ नोव्हेंबर १९४८, दुसरे १५ नोव्हेंबर १९४८ व तिसरे १७ ऑक्टोबर १९४९ला झाले. प्रत्येक कलमासंबंधी सविस्तर चर्चा झाली व शेवटी २६ नोव्हेंबर १९४९ला संविधान स्वीकृत झाले. राज्यघटना तयार करण्याचे काम  तब्बल दोन वर्षे अकरा महिने १७ दिवस चालले.  २४ जानेवारी  १९५० रोजी  संविधानाच्या हिंदी  आणि इंग्रजी हस्तलिखीतावर स्वाक्षरी करण्यात आली आणि  २६ जानेवारी १९५० रोजी देशाने ते संविधान आत्मसमर्पित केले. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. म्हणून हा दिवस प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.