पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

असा पार पडला होता पहिला प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिन

प्रजासत्ताक दिनी राजपथावर होणारा संचलन सोहळा हा पाहण्यासारखा असतो. भारतीय सैन्य, हवाईदल आणि वायूदलाच्या चित्तथरारक कवायती, विविध राज्यांचे चित्ररथ असे डोळे दिपवणारे पथसंचलन असते.  या सोहळ्याची परंपरा १९५० पासून सुरु आहे. पण  पहिले संचलन हे राजपथावर नाही तर इर्विन स्टेडियमध्ये पार पडले होते. तेव्हा ते आजच्या इतके भव्यदिव्य नव्हते. २१ बंदुकांची सलामी देत संचलनाला सुरुवात झाली होती. 

 १९५० ते १९५४ या काळात इर्विन स्टेडियम, लाल किल्ला, राम लिला मैदान अशा विविध ठिकाणी संचलन पार पडले होते. महत्त्वाचं म्हणजे त्यावेळी विविध राज्यांचे  चित्ररथ संचलनात सहभागी होण्याची संकल्पना नव्हती. २६ जानेवारी १९५० रोजी देशाने संविधान आत्मसमर्पित केले. भारत या दिवशी लोकशाही, सार्वभौम, गणराज्य बनला. याचदिवशी डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी  पहिले राष्ट्रपती म्हणून शपथ घेतली. हा सोहळा दरबार हॉलमध्ये पार पडला होता. सकाळी साडेदहा वाजता पहिल्या राष्ट्रपतींना ३१ बंदुकांची सलामी देण्यात आली होती. 

जनतेसाठी हा आनंदाचा दिवस होता. द हिंदू वृत्तपत्रानं त्याकाळी केलेल्या वार्तांकनात प्रजासत्ताक दिन सोहळ्याबद्दल विस्तारीत लिहलं आहे. या दिवशी दिल्लीतील अनेक मिठाईवाल्यांनी मोफत मिठाई दिली होती. दिल्लीतील फुलबाजारात झेंडू आणि गुलाबाच्या फुलांची खरेदी तेजीत होती. भारताला आता पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं याचा आनंद प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता. अनेकांनी संचलानच्या रस्त्यावर गुलाबाच्या पाकळ्या, झेंडूची फुले ठेवली असल्याचा उल्लेख आहे. या सोहळ्यासाठी इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष सुकर्णो हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.