पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देशात धार्मिक आधारावर फूट पाडण्याचा कट, सोनिया गांधींचा केंद्रावर आरोप

सोनिया गांधी

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शनिवारी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आर्थिक मंदी आणि बेरोजगारीच्या समस्येवरुन लक्ष हटवण्यासाठी धार्मिक आधारावर लोकांमध्ये फूट पाडणे तसेच संविधानला कमकुवत करण्याचा कट रचला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. 

सुषमा स्वराज, जॉर्ज फर्नांडिस, जेटलींसह ७ जणांना पद्मविभूषण

देशवासीयांना ७१ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देताना त्या म्हणाल्या की, ७० वर्षांपूर्वी देशातील लोकांच्या आकांक्षा आणि इच्छेनुसार भारताच्या संविधानाला देश व देशवासीयांनी स्वीकारले आणि ते लागू केले. आपल्या संविधानाच्या प्रस्तावनेत सर्वांसाठी न्याय, समानता, आझादी, धर्मनिरपेक्षता आणि बंधूभावाची भावना रेखांकित करते. 

संघर्ष करणाऱ्यांनी महात्मा गांधीजींचा मंत्र लक्षात ठेवावाः राष्ट्रपती

संविधानातील प्रत्येक अक्षर केवळ एक शब्द नाही. प्रत्येक नागरिकाचे जीवनदर्शन व सरकारांसाठी शासन चालवण्याचा जिवंत मार्ग आहे. हा रस्ता गांधीजींच्या नेतृत्वात कोट्यवधी स्वातंत्र्य सैनिकांनी हौतात्म्याने लिहिले गेले आहे. इथे प्रत्येक भारतवासीयाला सामाजिक, आर्थिक आणि राजनीतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, धर्म आणि उपासनेची स्वतंत्रता, प्रतिष्ठा आणि समतेचे अधिकार निश्चित करण्यात आले आहेत.

'बीजमाता' राहीबाई पोपरे, हिवरे बाजारचे पोपटराव पवार यांना पद्मश्री

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Religious Conflict Conspiracy in india Sonia Gandhi Target Narendra modi govt address nation on the eve of republic day