पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोविड -१९: देशात आतापर्यंत २० टक्के रुग्ण कोरोनामुक्त!

कोरोना विषाणू

देशातील कोरोना विषाणूग्रस्तांचा आकडा हा वाढत असला तरी रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी हा ९.१ दिवस इतका झाला आहे. कोरोनाच्या लढा देत असलेल्या प्रत्येकासाठी ही बाब दिलासा देणारी अशी आहे. शनिवारी आरोग्यमंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा केवळ ६ टक्के वाढला आहे. कोरोनाग्रस्तांच्या वाढीचा हा आतापर्यंतचा सर्वात कमी दर आहे. कोविड-१९ च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांच्या नेतृत्वाखाली मंत्री समूहाची एक बैठक पार पडली. त्यानंतर आरोग्यमंत्रालयाने देशातील परिस्थितीसंदर्भात माहिती दिली. 

मुंबई-पुण्यात १८ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवला जाऊ शकतो : राजेश टोपे

आरोग्य मंत्रालयाने एका परिपत्रकाच्या माध्यमातून जारी केलेल्या माहितनुसार, सध्याच्या घडीला देशात प्रतिदिन एक लाखाहून अधिक पीपीई किट आणि एन ९५ मास्क तयार होत आहेत. विशेष म्हणजे देशातील १०४ स्वदेशी कंपनीमध्ये हे साहित्य तयार करण्यात येत आहे. या शिवाय देशात व्हेंटिलिटरच्या उत्पादनालाही सुरुवात करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयाच्या माहितीनुसार, देशातील कोरोनामुळे होणारा मृत्यूदर ३.१ इतका आहे. कोरोना विषाणूची लागण झालेल्यांपैकी २०  टक्के रुग्ण यातून पूर्णपणे बरे झाले आहेत.  

सिब्बल म्हणाले, मोदीजी CAA, NRC वाद विसरुन कोरोनाविरोधात एकत्र लढू

देशव्यापी लॉकडाऊनच्या निर्णयामुळे जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारतातील परिस्थिती समाधानकारक अशी आहे, असेही आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.  सध्याच्या घडीला देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दुप्पट होण्याचा वेग हा नऊ दिवसांवर पोहचला आहे. आरोग्यमंत्रालयाने ही माहिती कोरोनाचा आढावा घेण्यासाठी नियुक्त केलेल्या मंत्री समूहाला दिली आहे. आतापर्यंत देशात ५,०६२ लोक कोरोनातून मुक्त झाले आहेत.