पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रिलायन्स देणार मोफत पेट्रोल-डिझेल आणि जेवण, जाणून घ्या कसे?

रिलायन्स पेट्रोल पंप

रिलायन्स उद्योग समूहाने कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोठा निर्णय घेतला आहे. रिलायन्स समूह कोरोनाबाधित रुग्णांना घेऊन जाणाऱ्या वाहनांना मोफत पेट्रोल आणि डिझेल देणार आहे. त्याचसोबत वेगवेगळ्या शहरांमध्ये मोफत जेवण उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा रिलायन्स उद्योग समूहाने केली आहे. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रिलायन्स समूह दिवसाला १ लाख मास्क तयार करत आहे.

क्रेडिट कार्ड बिल, EMI वसुली तूर्त टाळावी, चव्हाणांची केंद्राकडे मागणी

रिलायन्स उद्योग समूहाने सोमवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, 'सीएसआर (कंपनी सामाजिक जबाबदारी) युनिटद्वारे चालविल्या जाणाऱ्या रुग्णालयात कोरोनाबाधित रुग्णांसाठी १०० बेडची व्यवस्था केली आहे. तसंच, काम थांबले असेल तर कायम आणि कंत्राटी कामगारांना पूर्ण वेतन देण्यात येईल. कंपनी कोरोनाबाधित रूग्णांना घेऊन जाणाऱ्या आपत्कालीन वाहनांना मोफेत इंधन पुरवठा करणार आहे. त्याचबरोबर, कोरोनामुळे ज्यांच्या रोजीरोटीवर परिणाम झाला आहे त्यांना रिलायन्स फाउंडेशनतर्फे मोफत जेवण दिले जाणार आहे.'

आता फोनवरुन डॉक्टरांचा सल्ला घेता येणार, पण..

भारतात कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता रिलायन्स उद्योग समूहाने आपल्या कर्मचार्‍यांना घरून काम करण्यास सांगितले आहे. तसंच, रुग्णालय, दुकान आणि दूरसंचारसारख्या कंपनीत कमीत-कमी कर्मचाऱ्यांमध्ये काम केले जात आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेट पार्क आणि जामनगरमधील रिफायनिंग आणि पेट्रोकेमिकल कॉम्प्लेक्समध्येही काळजी घेतली जात असल्याचे रिलायन्सकडून सांगण्यात आले आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:reliance will provide petrol and diesel free of cost to vehicles carrying corona virus patient