पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

यूपीएच्या काळात १ लाख कोटींची कामं मिळाली, रिलायन्सचे राहुल गांधींना प्रत्युत्तर

अनिल अंबानी (PTI file photo)

अनिल अंबानी हे 'क्रोनी कॅपिटलिस्ट' असल्याचा आरोप काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केला होता. या आरोपाला रिलायन्स समूहाने रविवारी प्रत्युत्तर दिले आहे. यूपीए सरकारच्या काळात रिलायन्स समूहाला १ लाख कोटींची कामे मिळाली होती, काँग्रेस सरकार त्याकाळी अप्रामाणिक व्यावसायिकांना साथ देत होती का, असा थेट सवाल केला आहे. राहुल यांनी गोंधळ निर्माण करण्यासाठी वाईट हेतूने खोटा प्रचार सुरुच ठेवला असल्याचेही रिलायन्सने म्हटले आहे. 

राफेल करारावरुन राहुल गांधी हे सातत्याने सरकारवर हल्ला करत आहेत. अनिल अंबानी यांना फायदा मिळवून देण्याचा आरोप ते करतात. याबाबत 'पीटीआय'ने वृत्त दिले आहे.

अमेठीच्या मतदारांना राहुल गांधींचे पत्र

रिलायन्स समूहाने राहुल गांधींच्या ताज्या वक्तव्यावर म्हटले की, राहुल गांधी करत असलेल्या आरोपात कुठलेही तथ्य नाही. ते खोटे आणि बदनामी करणारे अभियान चालवत आहेत. त्यांनी आमचे अध्यक्ष अनिल अंबानी यांच्यावर 'क्रोनी कॅपिटलिस्ट' आणि अप्रामाणिक उद्योगपती असल्याचा आरोप केला आहे. जे पूर्णपणे असत्य आहे.

२००४ ते २०१४ दरम्यान यूपीए सरकारच्या १० वर्षांच्या काळात अनिल अंबानी यांच्या नेतृत्वाखालील समूहाला ऊर्जा, दूरसंचार, रस्ते, मेट्रो सारखी पायाभूत क्षेत्रातील सुमारे १ लाख कोटींची कामे मिळाली, यावर राहुल गांधी यांनी उत्तर द्यावे, असे रिलायन्सने म्हटले आहे.