पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर भेटीनंतर युरोपियन युनियनचे प्रतिनिधी म्हणाले...

काश्मीर दौऱ्यावरील शिष्टमंडळातील प्रतिनिधी

आम्ही काश्मीरमध्ये कोणतेही राजकारण करण्यासाठी आलेलो नाही. आम्ही इथे फक्त परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आलो आहोत, असे युरोपियन युनियनच्या खासदारांच्या शिष्टमंडळातील प्रतिनिधींनी सांगितले. मंगळवारी काश्मीरमध्ये सहा अकाश्मिरी मजुरांची हत्या करण्यात आली होती. त्याचाही या शिष्टमंडळाने निषेध नोंदविला आहे.

या ४ महत्त्वाच्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट १७ नोव्हेंबरपूर्वी निकाल देणार

कलम ३७० रद्द केल्यानंतर जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी युरोपियन युनियनचे एक शिष्टमंडळ दोन दिवस या राज्याच्या दौऱ्यावर आहे. मंगळवारी हे शिष्टमंडळ काश्मिरला पोहोचले. यावेळी त्यांनी काश्मीरमधील नागरिक, अधिकारी यांच्याशी संवाद साधून त्यांच्याकडून तेथील परिस्थिती समजून घेतली.

आम्ही सर्वजण तुमचे मित्रच आहोत. येथील परिस्थितीची पाहणी करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत, असे या शिष्टमंडळातील एका प्रतिनिधीने सांगितले. काश्मीर खोऱ्यातील दहशतवादी कारवाया संपविण्यासाठी केंद्र सरकारकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना आमचा संपूर्ण पाठिंबा असल्याचेही या शिष्टमंडळाने स्पष्ट केले.

आमदार विनय कोरे,चंद्रपूरचे जोरगेवार यांचा भाजपला पाठिंबा

जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द केल्यानंतर पहिल्यांदाच अशा पद्धतीने एक आंतरराष्ट्रीय शिष्टमंडळ काश्मीरमध्ये आले आहे. सरकारने कलम ३७० रद्द केल्यावर जम्मू-काश्मिरचे विभाजन केले असून, लडाख हा नवा केंद्रशाषित प्रदेश निर्माण केला आहे. दरम्यान, शिष्टमंडळाच्या आगमनाचा काश्मीरमधील काहींनी जोरदार विरोध केला. या विरोधात खोऱ्यामध्ये तीव्र निदर्शने करण्यात आली. त्याचबरोबर बाजारपेठांमधील दुकानेही बंद ठेवण्यात आली होती.