पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

काश्मीर प्रश्न द्विपक्षीय चर्चेतूनच सोडवा - डोनाल्ड ट्रम्प

डोनाल्ड ट्रम्प

काश्मीरच्या मुद्द्यावरून निर्माण झालेला तणाव पाकिस्तानने भारताशी द्विपक्षीय चर्चा करून सोडवावा, अशी भूमिका अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मांडली आहे. पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी दूरध्वनीवरून काश्मीर प्रश्नावर चर्चा केली. त्यावेळी त्यांनी वरील भूमिका मांडली. डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टपणे हा प्रश्न द्विपक्षीय चर्चेतून सोडविण्यास सांगितल्याने त्यांच्या आधीच्या वक्तव्यावरून निर्माण झालेला गोंधळ थांबण्यास मदत होणार आहे. 

जम्मूसह पाच जिल्ह्यांतील २जी मोबाईल इंटरनेट सेवा सुरू

डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधी इम्रान खान यांच्या भेटीवेळी काश्मीर प्रश्नावर मध्यस्थी करण्याची विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्याकडे केल्याचे म्हटले होते. त्यानंतर भारताने लगेचच याचा इन्कार केला होता. काश्मीर प्रश्नावर केवळ द्विपक्षीय चर्चाच होऊ शकते. अन्य कोणत्याही देशाने यात मध्यस्थी करू नये, असे भारताने स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली नवी भूमिका महत्त्वाची ठरली आहे.

व्हाईट हाऊसचे प्रवक्ते होगान गिडले यांनी दूरध्नवीवरून दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीवरून निर्माण झालेला तणाव भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी द्वपक्षीय चर्चेतून सोडविणेच महत्त्वाचे असल्याचे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्षांनी सांगितले आहे. 

खोडसाळ ट्विटर युजरच्या मागणीला आनंद महिंद्रा यांचे भन्नाट उत्तर!

त्याचबरोबर अमेरिका आणि पाकिस्तान या दोन्ही देशांमधील संबंध पुढील काळात कसे दृढ होतील, यावरही या दोन्ही देशांच्या नेत्यांमध्ये यावेळी चर्चा झाल्याचे या प्रवक्त्याने स्पष्ट केले.