पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

केजरीवाल यांना पुन्हा धक्का, आणखी एक आमदार भाजपमध्ये

आपचे आमदार देवेंदर सेहरावत हे भाजपात सहभागी झाले आहेत. (ANI)

आम आदमी पक्षाचे (आप) आमदार देवेंदर सेहरावत हे सोमवारी भाजपात सहभागी झाले आहेत. एक आठवडाभरात भाजपमध्ये सहभागी होणारे आपचे ते दुसरे आमदार ठरले आहेत. आपचे गांधी नगर मतदारसंघाचे अनिल वाजपेयी हे मागील शुक्रवारी भाजपत सामील झाले होते. आपने अपमानित केल्याचा आरोप सेहरावत यांनी केला आहे. 

सेहारवत हे विजवासनचे आमदार आहेत. एका पत्रकार परिषदेत त्यांनी भाजपचा हात हातात घेतला. यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते विजय गोयल आणि विजेंद्र गुप्ता हेही उपस्थित होते. पक्षाने आपल्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप त्यांनी केला. पक्षाच्या कोणत्याच क्रार्यक्रमाला आपल्याला बोलावले जात नसल्याचेही त्यांनी म्हटले. 

आपचे ७ नव्हे तर १४ आमदार संपर्कात, भाजपचा दावा

भारतीय लष्करातून निवृत्त झालेले सेहरावत म्हणाले की, पक्षाने माझा अपमान केला आहे. पण मी सहजपणे घेतले आणि लोकांसाठी विकासकामे करत राहिलो. 

आपच्या आमदारांना विकत घेण्यासाठी भाजपची १० कोटींची ऑफर- अरविंद केजरीवाल

सेहरावत जेव्हा कोणत्याच पक्षात नव्हते तेव्हापासून मी त्यांना भाजपमध्ये आणण्याचा प्रयत्न करत होतो, असे विजय गोयल यांनी यावेळी सांगितले.