पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Karnataka Crisis: विश्वासदर्शक ठराव घेण्याचा कुमारस्वामींचा निर्णय

कुमारस्वामी

कर्नाटकमध्ये काँग्रेस-जेडीएस सरकारवरील संकट कमी होताना दिसत नाही. राज्याचे मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी विश्वासदर्शक ठराव करण्याचा निर्णय घेतला असून कृपया यासाठी वेळ निश्चित करा, अशी विनंती विधानसभा अध्यक्षांना केली आहे. मी प्रत्येक गोष्टीसाठी तयार आहे. सत्तेला चिटकून राहण्यासाठी मी येथे नाही, असेही त्यांनी यावेळी म्हटले. 

कर्नाटकः आमदारांच्या राजीनाम्यावर मंगळवारी निर्णय

तत्पूर्वी सर्वोच्च न्यायालयात बंडखोर आमदारप्रकरणी सुनावणी झाली. विधानसभा अध्यक्षांना सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देण्याचा अधिकार आहे का, असा सवाल सर्वोच्च न्यायालयाने केला होता. 

सरन्यायाधीश रंजन गोगोई, न्या. दीपक गुप्ता आणि न्या.अनिरुद्ध बोस यांच्या घटनापीठाने कर्नाटक संकटावर विधानसभा अध्यक्ष आणि काँग्रेस-जेडीएसच्या बंडखोर आमदारांच्या याचिकेवर सुनावणी करत आहेत. 

'कर्नाटकमधील आघाडी सरकार वाचेल फक्त वेळ द्यायला हवा'