देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि रिलायन्स समुहाचे मालक मुकेश अंबानी यांनी जम्मू काश्मीर आणि लडाख येथे गुंतवणूकीची तयारी दर्शवली आहे. जम्मू काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर या प्रदेशातील विकासाला गती मिळेल, अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या. त्यानंतर रिलायन्स समुह या प्रदेशातील विकासासाठी विशेष कार्य करण्यास कट्टीबद्ध असल्याचे मुकेश अंबानी यांनी म्हटले आहे.
जम्मू काश्मीरमधील कलम ३७० हटवल्याच्या पार्श्वभूमीवर राष्ट्राला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योजकांनी या प्रदेशात गुंतवणूक करुन विकासाला चालना द्यावी, असे आवाहन केले होते. पंतप्रधानांच्या या आवाहनाला प्रतिसाद देण्यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे मुकेश अंबांनी यांनी सोमवारी रिलायन्स समुहाच्या ४२ व्या सर्वसामान्य वार्षिक बैठकीत सांगितले.
Reliance Jio GigaFiberची प्रतीक्षा संपली, ७०० रुपयांपासून प्लॅन्स
ते म्हणाले की, आम्ही जम्मू काश्मीर आणि लडाखमधील विकासासाठी तसेच जनतेच्या गरजा पूर्ण करण्यासाठी प्रतिबद्ध आहोत. या प्रदेशातील विकासाला गती देण्यासाठी विशेष उपक्रम राबवण्याची तयार आहोत. लवकरच याची घोषणा केली जाईल. उल्लेखनीय आहे की, मोदी सरकारने ५ ऑगस्ट रोजी जम्मू काश्मीरला विशेष दर्जा बहाल करणारे कलम ३७० हटवण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला होता. यासोबतच राज्याचे जम्मू काश्मीर आणि लडाख असे दोन केंद्रशासित प्रदेशात विभाजन करण्यात आले आहे.