पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पुलवामा हल्ल्यासाठी RDX, अमोनियम नायट्रेटचा वापर झाल्याचे स्पष्ट

पुलवामा हल्ला

फेब्रुवारीमध्ये पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यामध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेटचा एकत्रित वापर झाला होता, हे आता अधिकृतपणे स्पष्ट झाले आहे. दिल्लीतील केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेने आपला अहवाल सादर केला आहे. पाकिस्तान स्थित जैश ए मोहम्मद या दहशतवादी संघटनेकडून हा हल्ला घडविण्यात आला होता. या स्फोटात सीआरपीएफचे ४० जवान शहीद झाले होते.

नक्षल्यांविरोधात निर्णायक लढाई, आक्रमक कारवाईचे केंद्राचे संकेत

एनआयएच्या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, केंद्रीय न्यायवैद्यक प्रयोगशाळेतील दोन तज्ज्ञांनी आपला अहवाल सादर केला आहे. १४ फेब्रुवारीला पुलवामामध्ये दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी कोणत्या स्फोटकांचा वापर केला होता, हे त्यांनी स्पष्ट केले आहे. दहशतवाद्यांनी आरडीएक्स आणि अमोनियम नायट्रेट यांचा एकत्रितपणे वापर केला होता. सर्व स्फोटके दहशतवाद्यांनी मारुती ईको गाडीमध्ये ठेवली होती. 

अर्थसंकल्पापूर्वी मोदी सरकारचे शेतकऱ्यांना 'गिफ्ट', एमएसपीत वाढ

या प्रकरणी लवकरच आरोपपत्र दाखल करण्यात येणार आहे. या आरोपपत्रासाठी प्रयोगशाळेचा अहवाल अत्यंत महत्त्वाचा पुरावा ठरणार आहे, असेही या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. या स्फोटाची तीव्रता इतकी जास्त होती की त्यामुळे अनेक वस्तू अक्षरशः वितळल्या होत्या. स्फोटाच्या ठिकाणापासून अनेक किलोमीटर दूरवर त्याचा आवाज अनेकांनी ऐकला होता. पाकिस्तानी सैन्याने दहशतवाद्यांना हे आरडीएक्स दिल्याची माहिती भारतीय गुप्तचर यंत्रणांनी दिली आहे.