कोरोना विषाणूमुळे देशात २१ दिवसांचा लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. याचा फटका देशातील सर्वच क्षेत्रांना बसला आहे. देशातील गरीब आणि कामगारवर्गासाठी केंद्र सरकारने गुरुवारी १ लाख ७० हजार कोटींची योजना जाहीर केली आहे. त्याच्या दुसऱ्याच दिवशी आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनीही पत्रकार परिषद घेऊन रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कपात करुन उद्योग क्षेत्र आणि सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. कोरोना विषाणूमुळे आर्थिक क्षेत्रावर मोठा परिणाम होणार असून जीडीपीचे अपेक्षित उद्दिष्ठ गाठणे कठीण जाणार असल्याचे ते म्हणाले.
व्वा! शनिवारपासून दूरदर्शनवर 'रामायण' मालिकेचे पुनर्प्रक्षेपण
Repo rate reduced by 75 basis points to 4.4.%. Reverse repo-rate reduced by 90 basis points to 4%: RBI Governor Shaktikanta Das pic.twitter.com/eBb0WPAG21
— ANI (@ANI) March 27, 2020
व्याजदर कमी झाल्याने कर्जाच्या हप्त्याची रक्कम कमी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. रेपो रेट ५.१५ टक्क्यांवरुन ४.४ टक्क्यांवर आणण्यात आला आहे. रेपो रेटमध्ये ७५ बेसिस पाँईट्सची कपात करण्यात आली आहे. त्याचबरोबर रिव्हर्स रेपो रेटमध्येही ९० बेसिस पाँईट्सची कपात करण्यात आली आहे. अल्पमुदतीच्या कर्जावरील व्याजदरात कपात करण्यात आली आहे.
लपून प्रवास करणाऱ्या कामगारांचे ट्रक यवतमाळ पोलिसांनी पकडले
या निर्णयांमुळे कोरोना विषाणूचा सामना करण्यास मदत होईल. कोरोना विषाणूचा जगावर परिणाम झाला आहे. यामुळे आर्थिक आव्हान उभे राहू शकते. देशाच्या अर्थव्यवस्थेवरही याचा परिणाम होऊ शकतो. कोरोना विषाणूचा परिणाम देशाच्या अनेक क्षेत्रांवर पडला आहे. देशाची अर्थव्यवस्था मजबूत राहावी यासाठी आम्ही काही निर्णय घेत आहोत. कोरोनामुळे कॅश फ्लोमध्ये आलेले आव्हान पेलण्यासाठी पाऊल उचलले जात आहेत. कॅश रिझर्व्ह रेशोमध्ये (सीआरआर) १०० बेसिस पाँईंटची कपात करुन तो ३ टक्क्यांपर्यंत आणला आहे. हे एक वर्षांपर्यंतच्या कालावधीसाठी करण्यात आले आहे.
कोरोना तपासणी करायची आहे?, मग या लॅब्जमध्ये जा...
यावेळी दास यांनी बँकांना व्याज आणि कर्ज अदा करण्यास ३ महिन्यांची सूट देण्याचा सल्ला दिला आहे. या निर्णयांमुळे ३.७४ कोटी रुपयांची रोकड बाजारात येईल, अशी आशा दास यांनी व्यक्त केली. भारतीय बँकिंग यंत्रणा सुरक्षित आहे. काही कारणांमुळे लोकांना बँकांच्या सुरक्षिततेवर शंका आली. पण त्यांना चिंता करण्याची गरज नाही. ज्यांनी खासगी बँकांमध्ये गुंतवणूक केली आहे. त्यांनीही चिंता करण्याची गरज नाही. संकटाच्या क्षणीही आम्ही आशावादी आहोत. दास पुढे म्हणाले की, कोरोना विषाणूशी सामना करण्यासाठी सर्वांनी एकत्रित काम करण्याची गरज आहे. आरबीआयच्या या पावलांमुळे गृह, वाहन किंवा इतर कर्जांचे ईएमआय भरणाऱ्या कोट्यवधी लोकांना दिलासा मिळू शकतो. सर्वसामान्य लोकांबरोबर व्यवसायावर कोरोनाचा परिणाम पाहता सरकार कर्जाच्या हप्त्यावर दिलासा देण्याची तयारी सुरु केली आहे.
दि. ३ एप्रिलला चलनविषयक धोरण समितीच्या बैठकीत व्याज दरात कपात करण्याचा निर्णय घेतला जाऊ शकतो अशी अपेक्षा केली जात होती. परंतु, कोरोना लॉकडाऊनमुळे सध्याची स्थिती पाहता आरबीआयने आजच याची घोषणा केली.