पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पीएमसी बँकेच्या ग्राहकांना दिलासा, ४० हजार काढता येणार

पीएमसी बँक

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) पंजाब अँड महाराष्ट्र को-ऑपरेटिव्ह बँक (पीएमसी) सहा महिन्यांच्या पैसे काढण्याची मर्यादा वाढवून ४० हजार रुपये केली आहे. आता ही मर्यादा २५००० रुपये होती. पीएमसी बँकेत आर्थिक अनियमिततेचे प्रकरण समोर आल्यानंतर केंद्रीय बँकेने या बँकेतील ग्राहकांसाठी पैसे काढण्याची मर्यादा निश्चित करण्याबरोबर बँकेवर अनेक प्रकारचे निर्बंध घालण्यात आले आहेत. 

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आरबीआयच्या गव्हर्नर यांची भेट घेऊन ग्राहकांची चिंता दूर करण्याचा आग्रह केला होता. 

आरबीआयने २३ सप्टेंबरला बँकेवर निर्बंध घातल्यापासून पैसे काढण्याची मर्यादा वाढवण्याची ही तिसरी वेळ आहे. सर्वांत आधी पैसे काढण्याची मर्यादा ही १००० करण्यात आली होती. त्यानंतर टीका सुरु झाल्यानंतर २६ सप्टेंबरला ही मर्यादा वाढवून १०००० पर्यंत करण्यात आली होती.

पीएमसी बँक घोटाळा: राकेश वाधवानसह तिघांची रवानगी पोलिस कोठडीत

दरम्यान, न्यायालयाने या प्रकरणात अटकेत असलेल्या बँकेचे संचालक राकेश वाधवान, त्यांचा मुलगा सारंग वाधवान आणि बँकेचे अध्यक्ष वरयाम सिंग यांची रवानगी पोलिस कोठडीत केली आहे. न्यायालयाने त्यांना १६ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.