पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अखेर मुस्लिम महिलांना न्याय मिळाला; तिहेरी तलाकच्या प्रथेतून सुटका

ट्रिपल तलाक

मोदी सरकारने इतिहास रचला आहे. लोकसभेपाठोपाठ राजसभेतही तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाले आहे. या विधेयकाच्या बाजूने ९९ मतं पडली तर विरोधामध्ये ८४ मतं पडली आहेत. या विधेयकाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले होते. मुस्लिम समाजातून तिहेरी तलाक हद्दपार करण्यासाठी हे विधेयक महत्वपूर्ण मानले जात होते. गेल्या अनेक वर्षापासून मुस्लिम समाजातील महिलांच्या लढ्याला अखेर यश आले आहे. आता हे विधेयक राष्ट्रपतींकडे स्वाक्षरीसाठी पाठवण्यात येणार आहे. त्यानंतर त्याचे रुपांतर कायद्यामध्ये होणार आहे.

तिहेरी तलाक विरोधी विधेयक दोन्ही सभागृहात मंजूर झाल्यानंतर केंद्रीय कायदा मंत्री रविशंकर प्रसाद यांनी अशी प्रतिक्रिया दिली की, 'आजचा दिवस ऐतिहासिक दिवस आहे. दोन्ही सभागृहामध्ये मुस्लिम महिलांना न्याय देण्यात आला आहे. ही परिवर्तनाच्या दिशेने भारताची वाटचाल आहे.'

'देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. राज्यसभेमध्ये तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर होऊन आपल्या भगिनींना न्याय मिळाला आहे. तिहेरी तलाक विरोधी विधेयकासाठी ज्यांनी लढा दिला त्या सर्वांचे मी आभार मानतो.', असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींसह सर्व खासदारांचे आभार मानले आहेत.

 

'तिहेरी तलाक विरोधी विधेयक मंजूर झाल्यामुळे देशातील सर्व मुस्लिम महिलांची तिहेरी तलाकच्या प्रथेतून सुटका झाली. मोदी सरकारने मुस्लिम महिलांना समाजामध्ये सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवून दिला. मोदी सरकार महिला सक्षमीकरण आणि महिला हक्कांच्या संरक्षणासाठी समर्पित आहे.' असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. या ट्विटद्वारे त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, कायदा मंत्री रविशंकर प्रसाद, लोकसभा आणि राज्यसभेच्या सर्व खासदारांचे आभार मानले आहेत. तसंच अमित शहा यांनी देशातील सर्व मुस्लिम महिलांना शुभेच्छा दिल्या आहेत.

'खरंच आज कोट्यवधी मुस्लिम महिलांचा विजय झाला आहे. या सामाजिक क्रांतीचे नेतृत्व केल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानते.' असे ट्विट केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी केले आहे.

'हा महिला- पुरुष समानतेसाठी ऐतिहासिक निर्णय आहे. संपूर्ण देशासाठी आनंदाचा क्षण आहे.' मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ravishankar prasad says todays historic day Both the Houses have given justice to the Muslim women