पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कुलभूषण जाधव प्रकरणात भारत पुन्हा 'आयसीजे'कडे दाद मागणार, पाकनं दुसऱ्यांदा नाकारला कॉन्सुलर एक्सेस

कुलभूषण जाधव

कुलभूषण जाधव प्रकरणात पाकनं दुसऱ्यांदा कॉन्सुलर एक्सेस नाकारला आहे. त्यामुळे भारत पुन्हा एकदा आयसीजेकडे दाद मागणार आहे अशी माहिती परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते रविशकुमार यांनी दिली आहे. कुलभूषण यांना दुसऱ्यांदा कॉन्सुलर एक्सेस दिला जाणार नाही असं पाकिस्तानी परराष्ट्र खात्याकडून स्पष्ट करण्यात आलं आहे त्यामुळे या प्रकरणात आता आम्ही आयसीजेकडे दाद मागणार असल्याचं पत्रकार परिषदेत रविशकुमार यांनी स्पष्ट केलं आहे. 

दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला: शस्त्र साठ्यासह तिघांना अटक

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ता डॉ मोहम्मद फैसल यांनी कुलभूषण जाधव यांना दुसऱ्यांदा भारतीय दुतावासाची मदत दिली जाणार नसल्याचे सांगितले आहे.  हेरगिरी आणि दहशतवादाच्या  आरोपाखाली कुलभूषण जाधव यांना पाकनं सुनावलेल्या फाशीच्या शिक्षेचा फेरविचार करावा, त्यांना राजनैतिक संपर्काची परवानगी द्यावी, असे निर्देश आंतरराष्ट्रीय न्यायालयाने पाकिस्तानला दिले होते. 

'पद्म' पुरस्कारांसाठी या महिला खेळाडूंच्या नावांची शिफारस

कुलभूषण जाधव यांना अटक केल्यानंतर २ सप्टेंबर रोजी पहिल्यांदा कॉन्सुलर एक्सेस दिला होता. त्यावेळी इस्लामाबादमध्ये कार्यरत असलेले भारताचे उप उच्चायुक्त गौरव अहलूवाहिया यांनी कुलभूषण यांची भेट घेतली होती.