पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आठवलेंच्या कवितेने मोदी, सोनिया गांधींच्या चेहऱ्यावर फुलले हास्य

रामदास आठवले

लोकसभेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर ओम बिर्ला यांचे खासदारांनी संसदेत अभिनंदन केले. पण सर्वांत लक्षवेधक शुभेच्छा केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिल्या. आपल्या चिरपरिचत अंदाजात त्यांनी बिर्ला यांचे अभिनंदन केले. आठवलेंच्या भाषणावेळी संपूर्ण सभागृहात हास्यकल्लोळ उडाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला, सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना ही हसू आवरता आले नाही. 

'उद्धव ठाकरे १० वेळा अयोध्येत गेले तरी उपयोग नाही'

आठवलेंनी बिर्ला यांना शुभेच्छा देताना एक कविताच केली. ते म्हणाले, 'एक देश का नाम है रोम, लेकिन लोकसभा के अध्यक्ष बन गए हैं बिर्ला ओम, लोकसभा का आपको अच्छी तरह से चलाना है काम, वेल में आने वालों का ब्लैकलिस्ट में डालना है नाम, नरेंद्र मोदीजी और आपका दिल है विशाल, राहुलजी आप रहो खुशहाल, हम सब मिलकर हाथ में लेते हैं एकता की मशाल, और भारत को बनाते हैं और भी विशाल, आपका राज्य है राजस्थान, लेकिन लोकसभा की आप बन गए हैं शान, भारत की हमें बढ़ानी है शान, लोकसभा चलाने के लिए आप हैं पर्फेक्ट मैन।'

महायुतीचं त्रांगडं: 'कमळा'वर लढण्यास खोतांचा होकार, जानकरांचा नकार

यावेळी आठवले यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही टिप्पणी करत पुन्हा एकदा निवडून आल्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. आता मी तुम्हाला सत्तेवर येऊ देणार नाही. मोदी सरकार ५ वर्षांनंतर पुन्हा एकदा जिंकणार असल्याचे ते म्हणाले. आठवलेंच्या वक्तव्यावर राहुल गांधी, सोनिया गांधीही हसल्या. जेव्हा तुमची सत्ता होती. तेव्हा मी तुमच्याबरोबर होतो, असे त्यांनी म्हणताच संपूर्ण सभागृह हास्यकल्लोळात डुंबून गेले. काँग्रेसचे लोक यूपीएबरोबर येण्यासाठी सांगत होते. पण मोदींच्या बाजूने हवा असल्याचे मला समजले होते, असे म्हणताच मोदींनाही हसू आवरले नाही.