पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'आंतरजातीय विवाह प्रोत्साहन रक्कम व विद्यार्थी शिष्यवृत्तीत वाढ करणार'

रामदास आठवले (ANI)

रामदास आठवले यांनी केंद्रीय सामाजिक न्याय खात्याचे राज्यमंत्री म्हणून तर संजय धोत्रे यांनी दूरसंचार विभागाचे राज्यमंत्री म्हणून सोमवारी पदभार स्वीकारला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्त्वाखाली नवीन मंत्रिमंडळाचे खातेवाटप नुकतेच झाले असून, महाराष्ट्रातून ४ कॅबिनेट व ३ राज्यमंत्री अशा एकूण ७ मंत्र्यांचा यामध्ये समावेश आहे. रामदास आठवले यांनी शास्त्री भवनात सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारला. त्यांची पत्नी सीमा आठवले, मुलगा जीत आठवले आणि खात्यातील अधिकारी यावेळी उपस्थित होते. 

आघाडीवर भरवसा ठेवू नका, मायावतींचे पुन्हा एकला चलो रे...

पदभार स्वीकारल्यानंतर आठवले यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मंत्रालयाच्यावतीने देशभर राबविण्यात येत असलेल्या योजनांची माहिती दिली. मंत्रालयाच्यावतीने आंतरजातीय विवाहाला प्रोत्साहन देण्यासाठी २.५ लाख रूपये प्रोत्साहन रक्कम देण्यात येते. आगामी काळात ही रक्कम वाढविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच सध्या अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना माध्यमिक पूर्व व माध्यमिकोत्तर शिष्यवृत्ती २९० ते १२०० रूपयांपर्यंत देण्यात येते. या शिष्यवृत्तीत वाढ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या १० वर्षांपासून शिष्यवृत्तीची ही रक्कम कायम असून, त्यात वाढ करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

अनुसूचित जातीच्या मुला-मुलींना परदेशात शिक्षण घेण्यासाठी देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या कोटयात वाढ करण्यात येईल. तसेच मंत्रालयाअंतर्गत कार्यरत डॉ. आंबेडकर प्रतिष्ठानच्यावतीने अनुसूचित जातीतील जनतेला शस्त्रक्रियेसाठी देण्यात येणाऱ्या ३.५ लाखांच्या रकमेत वाढ करण्यात येणार असल्याचेही आठवले यांनी यावेळी सांगितले. अनुसूचित जातीच्या कल्याणासाठी मंत्रालयाच्यावतीने देण्यात येणाऱ्या निधीमध्ये ५५ हजार कोटींहून वाढ होऊन ७६ हजार कोटी रूपये झाल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. 

मोदींची प्रशंसा करणे काँग्रेस नेत्याला पडले महागात

देशातील ९० टक्के जनतेचे प्रतिनिधित्व करणारे सामाजिक न्याय मंत्रालय येत्या काळातही सक्षमपणे कार्य करेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Ramdas Athawale took charge as Union Minister of State for Social Justice and Empowerment for a second term on Monday