पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...तर आम्ही राहुल गांधींना अंडे फेकून मारुः रामदास आठवले

रामदास आठवले

देशातील युवक पंतप्रधान मोदींना काठीने मारतील असे काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी वक्तव्य केल्यानंतर देशात सुरु झालेला वाद अजून थांबण्याचे नाव घेताना दिसत नाही. आता यात केंद्रीय मंत्री तथा रिपाइं नेते रामदास आठवले यांनी उडी घेतली आहे. त्यांनी यावरुन राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला आहे. राहुल गांधी जर पंतप्रधानांना काठीने मारतील. तर आम्ही त्यांना अंडे फेकून मारु, असा टोला त्यांनी लगावला आहे.

राहुल गांधींच्या 'त्या' वक्तव्यावर मोदींनी दिले असे उत्तर

'एएनआय'ने यासंबंधीचे वृत्त दिले आहे. रामदास आठवले पुढे म्हणाले की, अशा वक्तव्यांमुळेच राहुल गांधी यांचा अमेठी लोकसभा मतदारसंघात पराभव झाला आहे. राहुल गांधी काँग्रेसला कमकुवत बनवत आहेत. ते एकेदिवशी काँग्रेसला नष्ट करुन टाकतील, अशी टीकाही त्यांनी केली. 

दरम्यान, एका सभेत राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली होती. ते म्हणाले होते की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भाषण देत आहेत. पण ६ महिन्यांनंतर ते घरातून बाहेर पडू शकणार नाहीत. कारण भारतातील तरुण त्यांच्या पाठीवर फटके मारतील आणि त्यांना समजावतील की भारतातील तरुणांना रोजगार दिल्याशिवाय देश पुढे जाणार नाही.'

राहुल गांधींच्या त्या वक्तव्याला आसाममध्येही मोदींकडून प्रत्युत्तर

याला पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत उत्तर दिले होते. 'सहा महिन्यांनंतर माझ्या पाठीवर फटके मारण्याचे वक्तव्य केले जात आहे. हे काम थोडे अवघड आहे. याची तयारी करण्यासाठी सहा महिने लागतीलच. मी सुध्दा ठरवले आहे की सहा महिन्यात सूर्य नमस्काराची संख्या वाढवणार. तसंच मी सहा महिने ऐवढी मेहनत करेन की जेणेकरून माझ्या पाठीला प्रत्येक फटके सहन करण्याची ताकद मिळेल.' असा टोला मोदींनी राहुल गांधींना लगावला.