पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रामदास आठवलेंनी शिवसेनेचे टेन्शन घेऊ नये, संजय राऊतांचा टोला

संजय राऊत (ANI)

राज्यात लवकरच शिवसेनेच्या नेतृत्त्वाखालील सरकार येईल, याबद्दल आमच्या मनात कोणताही गोंधळ नसल्याचे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मंगळवारी स्पष्ट केले. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सोमवारी संध्याकाळी दिल्लीत पत्रकार परिषदेत केलेल्या वक्तव्यानंतर संजय राऊत यांच्या विधानाला महत्त्व प्राप्त झाले आहे. 

एनडीएतून बाहेर काढणारे तुम्ही कोण?, शिवसेनेचा सवाल

संजय राऊत म्हणाले, लवकरच महाराष्ट्रात स्थिर आणि कार्यक्षम सरकार येईल आणि त्याचे नेतृत्त्व शिवसेनाच करेल. शरद पवार यांना समजून घ्यायला १०० जन्म घ्यावे लागतील. सरकार येणार याबद्दल जो काही गोंधळ आहे तो केवळ माध्यमांमध्येच आहे. शिवसेनेच्या मनात कोणताही गोंधळ नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मराठी अभिनेत्री प्राजक्ता माळीविरोधात जामीनपात्र अटक वॉरंट जारी

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी शिवसेना आणि भाजपची पुन्हा युती व्हावी आणि त्यांनी सरकार स्थापन करावे, यासाठी एक नवा फॉर्म्युला सोमवारी दिला होता. त्यावरही संजय राऊत यांनी टीका केली. रामदास आठवले केंद्रात राज्यमंत्री आहेत. त्यांनी कॅबिनेट मंत्रीपद कसे मिळेल हे पाहावे. शिवसेनेचे टेन्शन त्यांनी घेऊ नये, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.