पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तीन चाकांचे सरकार जास्त काळ धावू शकणार नाही: रामदास आठवले

रामदास आठवले

केंद्रीय मंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास आठवले यांनी महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. 'तीन चाकांचे सरकार जास्त काळ धावू शकणार नाही.', असे रामदास आवठले यांनी सांगितले आहे.

फडणवीस आणि महाजनांमुळे माझं तिकीट कापलं: एकनाथ खडसे

एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना रामदास आठवले यांनी सांगितले की, 'महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. परंतु मला वाटत नाही की तीन चाकी सरकार फार काळ टिकेल. या सरकारला चार चाकांची आवश्यकता होती.', अशी टीका रामदास आठवलेंनी केली आहे.

'अखिलेश यादव यांनी महिनाभर पाकिस्तानात राहावे मग त्यांना कळेल'

दरम्यान, रामदास आठवले यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेनेने भाजपसोबत सत्ता स्थापन करावी असे सांगितले होते. मात्र मुख्यमंत्री पदावरुन शिवसेना आणि भाजपमध्ये वाद झाला. त्यामुळे भाजप नेतृत्वाखाली सरकार स्थापन झाले नाही. त्यानंतर शिवसेनेने काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत येत महाविकास आघाडीचे सरकार स्थापन केले. 

आणि प्रजासत्ताक दिनाच्या चित्ररथासाठी पश्चिम बंगालचा प्रस्ताव

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:ramdas athawale says the three parties have come together but I dont think the three wheeler can run long