कोरोना विषाणूने देशात अक्षरश: धुमाकूळ घातलाय. दिवसागणिक कोरोनाग्रस्त रुग्णांची सख्या वाढत असून हा आकडा दोन हजारच्या घरात पोहचला आहे. आतापर्यंत देशात पन्नासहून अधिक रुग्णांनी आपला जीव गमावला असून देशातील नागरिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा संबोधित करणार आहेत. शुक्रवारी सकाळी ९ वाजता मोदी एका व्हिडिओच्या माध्यमातून देशवासियांना खास संदेश देणार आहेत. याच पार्श्वभूमीवर लॉकडाऊनच्या काळात पुन:प्रेक्षपित करण्यात येणारी रामायण ही मालिका नियोजित वेळेत प्रेक्षिपत होणार नसल्याची माहिती प्रसार भारतीकडून देण्यात आली आहे.
लॉकडाऊन: तीन बहिणींनी थेट PMO ला कॉल करत मांडली उपासमारीची व्यथा
देशातील कोरोनाच्या वेगाने होणाऱ्या संक्रमणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १९ मार्च रोजी रात्री ८ वाजता पहिल्यांदा देशवासियांना संबोधित केले. यावेळी मोदींनी २२ मार्चला जनतेने स्वत: संचारबंदी पाळावी असे म्हणत जनता कर्फ्यूचे आवाहन केले. याला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर दुसऱ्यांदा देशवासियांन संबोधित करताना मोदींनी २१ दिवस लॉकडाऊनची घोषणा केली होती.
In view of the Important Video Message from the Hon’ble PM tomorrow morning, the telecast of Ramayan on @DDNational will be delayed by a few minutes. https://t.co/5CFJ8QOp4v
— Prasar Bharati (@prasarbharati) April 2, 2020
लॉकडाऊनच्या काळात सरकारने लोकप्रिय ठरलेल्या रामायण मालिका पुन्हा प्रेक्षपित करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जनतेच्या मागणीनुसार, २८ मार्चपासून सकाळी ९ वाजता पहिला भाग आणि रात्री ९ वाजता दुसरा भाग अशा दोन भागात दूरदर्शनवर रामायण मालिका दाखवण्यात येत आहे. शुक्रवारी ३ एप्रिल सकाळी ९ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना संदेश देणार आहेत. त्यामुळे रामायण प्रसारित होण्यास विलंब होऊ शकतो, अशी माहिती प्रसारभारतीने ट्विटच्या माध्यमातून दिली आहे.
भारतीय जवानांनी दिलेल्या प्रत्युत्तरात पाकिस्तानचे ३ सैनिक ठार